मुंबई - Adil Khan and Somi Khan Wedding : 'मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल क्वीन' राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आणि उद्योगपती आदिल खान दुर्रानीनं पुन्हा एकदा लग्न केलं आहे. आदिलनं जयपूरमध्ये गुपचूप लग्न केल्याचं आता समजत आहे. आदिलनं ज्या मुलीशी लग्न केलं तिचा थेट संबंध सलमान खानशी देखील आहे. आदिलनं 2022 मध्ये राखी सावंतबरोबर लग्न केलं होतं. यानंतर त्याचं नात फार काळ टिकू शकलं नाही. राखी सावंतनं आदिलवर अनेक आरोप केले होते. हे आरोप इतके गंभीर होते की, त्याला तुरूंगातही जावं लागलं होत. यानंतर काही दिवसानंतर आदिलची सुटका झाली.
आदिल खाननं सोमी खानशी 'बिग बॉस 12' फेम केलं लग्न :आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 'बिग बॉस 12' फेम सोमी खानशी लग्न केलं आहे. सोमीनं 'बिग बॉस 12'मध्ये एक सामान्य स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. 'बिग बॉस 12'मध्ये सोमीबरोबर तिची मोठी बहीण सबा खान देखील स्पर्धक म्हणून आली होती. सोमी आणि सबा जयपूरमधील आहे. आता सध्या या आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. आदिल आणि सोमीनं त्यांच्या लग्नाच्या वृत्तावर काहीही विधान सध्या केलेले नाहीत. मात्र आता आदिल आणि सोमीच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर खूप वेगानं पसरत आहे.