मुंबई - बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. राखी सावंतची चर्चा केवळ देशातच नाही तर देशाबाहेरही होते. आजकाल राखी तिच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच राखीनं सांगितलं होतं की, ती पाकिस्तानी 'इन्स्पेक्टर' म्हणजेच अभिनेता दोदी खानशी लग्न करणार आहे. यानंतर दोदी खाननं एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यानं सांगितलं होत की तो, राखी सावंतशी लग्न करू शकत नाही. दोदी खाननं असंही म्हटलं होतं की, तो राखीसाठी नक्कीच मुलगा शोधेल. दरम्यान एक पाकिस्तामधील सुंदरी अभिनेत्री राखीचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याची दिसत. ही सुंदरी दुसरी तिसरी कोणी नसून पाकिस्तानी नाट्यसृष्टीतील टॉप अभिनेत्री हानिया आमिर आहे.
राखींन हानियाचं केलं कौतुक :काही दिवसांपूर्वीच राखी सावंतनं हानिया आमिरचं कौतुक केलं होतं. राखीच्या या विधानाची चर्चा सोशल मीडियावर खूप रंगली होती. आता हानियानेही राखी सावंतवर तिचे प्रेम दाखवले आहे. तिनं राखीसाठी असं काहीतरी केलं, जे पाहून ड्रामा क्वीनला नक्कीच आनंद होईल. हानिया आमिरचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये, हानियाच्या हातात कार्डबोर्ड असल्याचं दिसत आहे आणि ती याला घेऊन विमानतळाबाहेर आहे. या कार्डबोर्डवर असं लिहिलं आहे, 'राखी जी, मी इथे आहे.'आता या फोटोच्या पोस्टमध्ये एका यूजरनं लिहिलं, 'हानिया रॉक राखी शॉक.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'हानिया राखीची वाट विमातळावर पाहात आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'तुझ्यात आणि राखी सावंतमध्ये थोडाही फरक आहे.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.