मुंबई - Mr and Mrs Mahi First Song To Release Soon :निर्माता करण जोहरचा आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. दरम्यान करण त्याच्या आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'मधील पहिलं गाणं रिलीज करण्याच्या तयारीत आहे. करण जोहरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या आगामी चित्रपटामधील पहिल्या गाण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. करणनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "हे गाणं प्रत्येकाच्या हृदयात गुंजेल, एका छोट्याशा स्माईलनं आणि शुद्ध प्रेमानं भरलेले आहे हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. लवकरच तुमच्या समोर रिलीज होईल." या पोस्टच्या कॅप्शनमध्ये करणनं लिहिले आहे, "तुम्हाला माहिती आहे... हे काय आहे... लवकरच येत आहे."
'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटामधील पहिलं गाणं :आता करणनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून त्याचे आणि त्याच्या आगामी चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. करणचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये राजकुमार राव आणि जान्हवी कपूर व्यतिरिक्त जरीना वहाब, कुमुद मिश्रा, राजेश शर्मा, अभिषेक बॅनर्जी, पूर्णेंदू भट्टाचार्य, अभिलाष चौधरी आणि इतर कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटासाठी जान्हवी कपूरनं खूप मेहनत घेतली आहे. ती पहिल्यांदा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दिसेल. तिचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहेत.