महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आर माधवननं हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर'चं केलं कौतुक - सिद्धार्थ आनंद

R Madhavan Fighter: आर. माधवननं सिद्धार्थ आनंदच्या 'फायटर' चित्रपटाचे कौतुक केलं आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

R Madhavan Fighter
आर माधवन आणि फायटर

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 3:28 PM IST

मुंबई - R Madhavan Fighter : 25 जानेवारीला 'फायटर' हा चित्रपटगृहात रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता आर. माधवननं हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' चित्रपटाचे कौतुक केले आहे. माधवननं या चित्रपटाला अप्रतिम म्हणत ॲक्शन थ्रिलर टीमवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ''सिद्धार्थ आनंद, तुमचा 'फायटर' हा खूप विलक्षण चित्रपट आहे. 'फायटर' टीमनं केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल अभिनंदन. तुम्ही भारतीय चित्रपटसृष्टीला एक सुंदर, 'सुपर मोटिवेटिंग मूव्हिंग' चित्रपट दिला आहे.''

'फायटर' चित्रपटाची स्टारकास्ट :सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर या चित्रपटात अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आतापर्यत या चित्रपटानं 100 कोटीहून बॉक्स ऑफिसवर अधिक व्यवसाय केला आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. चित्रपटात हृतिकला स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानिया उर्फ पॅटी, दीपिका स्क्वॉड्रन लीडर मीनल राठोड उर्फ​ मिन्नी आणि अनिल कपूर हा ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ रॉकीच्या भूमिकेत देशासाठी लढताना दाखवण्यात आले आहे. रुपेरी पडद्यावर हृतिक आणि दीपिकानं पहिल्यांदाच एकत्र काम केलंय. हा चित्रपट 250 कोटीमध्ये निर्मित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहे.

'फायटर' चित्रपटाची क्रेझ : या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत ऋषभ साहनी दिसला आहे. 'फायटर' चित्रपटाची क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. चाहते 'फायटर' चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये पोहोचत आहेत. आता अनेकजण सोशल मीडियावर मूव्ही हॉलमधील फोटो देखील शेअर करत आहेत. 'फायटर' हा काही दिवसात देशांर्गत 200 कोटीचं लक्ष गाठेल अशी अपेक्षा केली जात आहेत, मात्र सध्या या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 135.9 कोटीची कमाई केली आहे. दरम्यान आर. माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'वेट्टयान' आणि 'टेस्ट' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'सैतान' चित्रपटात अजय देवगणसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. ‘भक्षक’चा ट्रेलर रिलीज, तडफदार पत्रकाराच्या भूमिकेत भूमी पेडणेकरचा नवा अवतार
  2. मलायका अरोरा आणि करीना कपूरनं अमृता अरोराला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
  3. धर्मेंद्रसोबतच्या किंसिंग सीनमुळे तब्बूनं उडवली शबाना आझमीची खिल्ली

ABOUT THE AUTHOR

...view details