मुंबई :साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' यावर्षी 5 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत. 'पुष्पा 2' चित्रपट अजूनही चित्रपट धमाकेदार कमाई करत आहे. 'पुष्पा 2: द रुल' आपल्या दैनंदिन कलेक्शनसह नवीन विक्रम बॉक्स ऑफिसवर निर्माण करत आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल'नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात 725.8 कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाचा दबदबा बॉक्स ऑफिसवर कायम आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटानं रिलीजच्या नवव्या दिवशी 36.4 कोटी रुपयांची कमाई केली, तर दहाव्या दिवशी या चित्रपटानं 62.3 कोटी बॉक्स ऑफिसवर छापले आहेत.
'पुष्पा 2: द रुल' जगभरातील कलेक्शन :'पुष्पा 2: द रुल' चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 800 कोटीचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची 10 दिवसात एकूण 824.5 कोटी रुपयांची कमाई करून नवा विक्रम रचला आहे. 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटानं 'आरआरआर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकले आहे. 'पुष्पा 2' हा भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचं पुढील लक्ष 'केजीएफ 2' आहे. 'केजीएफ 2' चित्रपटाची एकूण कमाई 859.7 कोटीची आहे. 'पुष्पा 2'चं जगभरातील कलेक्शन 1190 कोटी झालं आहे. आता हा चित्रपट 1500 कोटी कमाई करण्याच्या तयारीत आहे.
'पुष्पा 2: द रुल'ची एकूण कमाई
पहिल्या दिवशी 164.25 कोटी रु.
दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी रु.
तिसऱ्या दिवशी 119.25 कोटी रु.
चौथ्या दिवशी 141.05 कोटी रु.
पाचव्या दिवशी 64.45 कोटी रु.