मुंबई - South upcoming Movies : 'कांतारा', 'कार्तिकेय 2' आणि 'हनुमान' यांसारख्या साउथ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबदस्त कमाई केली. हे चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप यशस्वी ठरले. आता साऊथ स्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' हा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत. आता 2024मध्ये काही साऊथ चित्रपट रुपेरी पडद्यावर धमाल करणार आहेत. या साऊथच्या चित्रपटाबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.
- अधीरा : प्रशांत वर्माचे दिग्दर्शित साऊथ आगामी 'अधीरा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट भगवान इंद्र यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेता कल्याण दसरी हा दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा 2022 रोजी करण्यात आली होती.
- कल्कि 2898 एडी : प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन स्टारर 'कल्की 2898 एडी' मध्ये महाभारताशी संबंधित कहाणी पाहायला मिळणार आहे. नाग अश्विनच्या या चित्रपटातील अमिताभ बच्चनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी संक्रांतीच्या मुहूर्तावर 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुष्पा 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन यांनी सुकुमार केलं आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
देवरा : ज्युनियर एनटीआरचा 'देवरा' सध्या खूप चर्चेत आहे. कोरटाळा शिवा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपटात जान्हवी कपूर त्याच्याबरोबर मुख्य भूमिकेत असणार आहे.