मुंबई : अल्लू अर्जुनच्या मेगा-ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2: द रुल'चा पहिला वीकेंड धमाकेदार होता. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर विक्रम केला आहे. 'पुष्पा 2'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. पहिल्या चार दिवसांच्या वीकेंडमध्ये जगभरात 800 कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटानं केला आहे. 'पुष्पा 2'नं जगभरात 294 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. पहिल्या वीकेंडमध्ये भारतात या चित्रपटानं 500 कोटी रुपयांची कमाई केली.
'पुष्पा 2: द रुल'चं बॉक्स ऑफिसवर वादळ : सध्या संपूर्ण देशात 'पुष्पा 2'ची प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटानं प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ला मागे टाकले आहे. 2024मधील परदेशातील बॉक्स ऑफिसवर भारतीय चित्रपटांमधून सर्वात मोठा ओपनिंग देणार 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट ठरला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं 4 दिवसात जगभरात 800 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट पुढला वीकेंड येण्यापूर्वी 1000 कोटीचा आकडा पार करेल, अशी अपेक्षा आता अनेकजण करत आहेत. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं चौथ्या दिवशी भारतातील सर्व भाषांमध्ये एकूण 141 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'जवान'चा रेकॉर्ड मोडला :तसेच हिंदी आवृत्तीमध्ये या चित्रपटानं 85 कोटी रुपये कमावले आहेत. 4 दिवसात, भारतीय बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'नं एकूण 529.72 कोटीची कमाई केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटानं फक्त भारतीय बॉक्स ऑफिसवरच नाही, तर जगभरातील बॉक्स ऑफिसवरही विक्रम मोडले आहेत. ' पुष्पा 2' चित्रपटानं हिंदी आवृत्तीमध्ये 'जवान'चा रेकॉर्ड मोडला आहे. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड जलद गतीनं कमाई करत आहे.
'पुष्पा 2: द रुल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
प्रीमियर शो - 10.65 कोटी