मुंबई : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा 2- द रुल' चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होत आहे. अल्लू अर्जुन आणि चित्रपटाची संपूर्ण टीम अजूनही चित्रपटाच्या काही दृश्यांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. दिग्दर्शक सुकुमार 'पुष्पा 2'चे शूटिंग नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार आहेत. दरम्यान 'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल एक अपडेट आली आहे. 2023 च्या मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'मधील एका अभिनेत्यानं 'पुष्पा 2'मध्ये एन्ट्री केली आहे. बॉबी देओल, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'ॲनिमल' चित्रपटात खलनायकाची भूमिका त्यानं साकारली होती.
'पुष्पा 2'मध्ये'ॲनिमल' कलाकाराची एन्ट्री : आता साऊथ अभिनेता ब्रह्मानं 'पुष्पा 2' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात 'पुष्पा 2'चे दिग्दर्शक सुकुमार, ब्रह्मा, फहद फासिल आणि 'ॲनिमल' अभिनेता सौरभ सचदेवा दिसत आहेत. हे सर्व एकाच गाडीत आहेत. कार 'पुष्पा 2'चा खलनायक 'भंवर सिंग शेखावत' फहाद चालवत आहे. 'पुष्पा 2'मधील रोमांचक एंट्री सौरभ सचदेवाची असणार असल्याचं बोललं जात आहे. 'ॲनिमल' चित्रपटात सौरभ सचदेवानं बॉबी देओलच्या धाकट्या भावाची भूमिका केली होती. सौरभला 'ॲनिमल' चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली.