ETV Bharat / entertainment

हृतिक-रणबीरला मागे टाकून जगातील टॉप 10 देखण्या कलाकारांमध्ये शाहरुख खानच्या नावचा समावेश - BOLLYWOOD KING KHAN

एका वैज्ञानिक अभ्यासात शाहरुख खानची जगातील टॉप 10 देखण्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून निवड झाली आहे. तुम्ही संपूर्ण यादी येथे पाहा...

SHAH RUKH KHAN
शाहरुख खान (शाहरुख खान (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 17, 2024, 7:40 PM IST

मुंबई : शाहरुख खान हा जगातील देखणा अभिनेत्यांपैकी एक आहे. सेलिब्रिटी प्लास्टिक सर्जन डॉ. ज्युलियन डी सिल्वा यांनी केलेल्या वैज्ञानिक अभ्यासानुसार, शाहरुख खानचाही जगातील टॉप 10 देखण्या अभिनेत्यांमध्ये समावेश असल्याचं सांगितलं आहे. या यादीत ब्रिटीश अभिनेता आरोन टेलर जॉन्सन यानं पहिलं स्थान पटकावलं आहे. दरम्यान बॉलिवूडचा 'किंग खान'ला जगातील टॉप 10 सर्वात देखण्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळालं आहे. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे. शाहरुख खान सध्या 58 वर्षांचा असून आजही त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. वयाच्या या टप्प्यावर शाहरुखनं हृतिक आणि रणबीरसारख्या बॉलिवूड स्टार्सला मागं टाकलं आहे.

हा वैज्ञानिक अभ्यास कसा केला जातो? : हा वैज्ञानिक अभ्यास ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉ. ज्युलियन डिसिल्वा यांनी केला आहे. यामध्ये चेहऱ्याची परिपूर्णता मोजण्यासाठी ग्रीक गोल्डन रेशो ऑफ ब्युटी फी पद्धत वापरली जाते. यानुसार, 'किंग खान'चा चेहरा 86.76% परफेक्शनसह 10 व्या क्रमांकावर आहे. सौंदर्य मोजण्यासाठी ही पद्धत अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. या यादीत शाहरुखनं 10 व्या क्रमांकावर आपले स्थान पटकवलं आहे. ब्रिटीश अभिनेता आरोन टेलर जॉन्सन या यादीत अव्वल असून त्याचा चेहरा या पद्धतीशी 93.04% जुळतो. लुसियन लॅव्हिस्काउंट दुसऱ्या स्थानावर तर ग्लॅडिएटर स्टार पॉल मेस्कल तिसऱ्या स्थानावर आहे.

कलाकारांची यादीमधील नाव

1. आरोन टेलर जॉन्सन

2. लुसियन लॅव्हिस्काउंट

3. पॉल मेस्कल

4. रॉबर्ट पॅटिन्सन

5. जॅक लोवेन

6. जॉर्ज क्लूनी

7. निकोलस होल्ट

8. चार्ल्स मेल्टन

9. इद्रिस एल्बा

10. शाहरुख खान

शाहरुख खानचा आगामी चित्रपट : डॉ. ज्युलियन डी सिल्वा यांनी केलेल्या या वैज्ञानिक अभ्यासाच्या यादीत स्थान मिळवून शाहरुख खाननं हे सिद्ध केलं की केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही त्याचे प्रचंड चाहते आहेत. शाहरुखनं गेल्या वर्षी 'पठाण' आणि 'जवान'बरोबर जबरदस्त कमबॅक केलं असून आता तो पुढं 'किंग'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खानची मालिका 'फौजी'चा सीक्वल 35 वर्षांनंतर घोषित, मोशन पोस्टर रिलीज...
  2. शाहरुख खानला आयफा 2024मध्ये आर्यन खानच्या अटकेचे दिवस आठवले, म्हणाला- 'टफ टाइम' - IIFA 2024
  3. आयफा अवॉर्ड्स 2024 : शाहरुख खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर राणी मुखर्जी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - IIFA 2024 Winners Full List

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.