महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Pulkit And Kriti Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नातील फोटो व्हायरल - Pulkit And Kriti Wedding

Pulkit And Kriti Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांचे 15 मार्च रोजी लग्न झालं आहे. आज या जोडप्यानं त्याच्या लग्नामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pulkit And Kriti Wedding
पुलकित आणि क्रितीचे लग्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 5:29 PM IST

मुंबई - Pulkit And Kriti Wedding : हिंदी चित्रपटसृष्टीचे सुंदर कपल पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा 15 मार्च रोजी विवाहबद्ध झाले आहेत. या जोडप्यानं गुरुग्राममधील आयटीसी भारत ग्रँडमध्ये कुटुंबिय आणि मित्राच्या उपस्थित सात फेरे घेतले असून आता त्याच्या लग्नामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या अनेकजण या जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नाच्या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. 16 मार्च रोजी पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी देखील त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

पुलकित आणि क्रितीच्या लग्नामधील फोटो व्हायरल : पुलकित आणि क्रिती लग्नाच्या फोटोत फुलांच्या वर्षाव दरम्यान शाही शैलीत प्रवेश करताना दिसत आहेत. क्रिती खरबंदानं तिच्या लग्नासाठी गुलाबी रंगाचा लेंहगा परिधान केला होता. यावर तिनं गुलाबी रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. लूकला आणखी सुंदर बनवण्यासाठी तिनं मांग टिका आणि नथनी घातली आहे. याशिवाय तिनं यावर सोनेरी रंगाचे दागिने परिधान केले आहेत. दुसरीकडे पुलकितनं हिरव्या रंगाची नक्षीदार शेरवानी घातली आहे आणि यावर त्यानं डोक्यावर मॅचिंग स्कार्फ बांधला आहे. पुलकितच्या शेरवानीवर अनेक मंत्र लिहिलेले दिसत आहेत.

पुलकित सम्राटचं दुसरे लग्न :पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाला क्रिती सेनॉन, पंजाबी गायक जस्सी गिल, गायक अरमान मलिक, बॉबी देओल, भोली पंजाबन फेम रिचा चढ्ढा, संजय कपूर आणि गायक स्टेबिन बेन यांच्यासह अनेक स्टार्सनी लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुलकित सम्राटचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी 2014 मध्ये पुलकितनं गर्लफ्रेंड श्वेता रोहिराबरोबर लग्न केलं होतं, जे 2015 मध्ये तुटले आणि दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर पुलकित आणि क्रिती 2019 मध्ये 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि तेव्हापासून हे जोडपे एकमेकांना डेट करू लागले. पुलकित आणि क्रिती 'तैश' आणि 'वीरे की वेडिंग' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्येही एकत्र दिसले आहेत. या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुलकित शेवटी 'फुकरे 3' या चित्रपटामध्ये दिसला होता. याशिवाय क्रिती शेवटी '14 फेरे'मध्ये दिसली होती. आता पुढं ती 'हाऊसफुल्ल 5', 'रिस्की रोमियो' 'वान' आणि 'पप्पू' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.


हेही वाचा :

  1. Akshay and Tiger Shroff : पाहा, 'बडे मियाँ' अक्षयची 'छोटे मियाँ' टायगरशी 'अशी ही बनवाबनवी' !!
  2. Prabhas Returns : 'कल्की 2898 एडी'च्या शुटिंगनंतर प्रभास इटलीहून मायदेशी परतला, पाहा त्याचा स्टायलिश लूक
  3. Fateh Teaser out : सोनू सूद स्टारर 'फतेह'चा थरारक टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details