मुंबई - Priyanka Chopra: बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असलेली ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानं नवविवाहित जोडपं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटला इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आणि आपला अनुभवही शेअर केला. अनंत राधिकाच्या लग्नासाठी प्रियांका तिचा पती निक जोनासबरोबर भारतात आली होती. या शाही लग्न सोहळ्यात प्रियांका आणि निकनं मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रियांका-निक अंबानींच्या लग्नासाठी खास पाहुणे
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 12 जुलै रोजी मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला हजेरी लावली होती. तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केलेल्या आकर्षक केशरी लेहेंग्यात अभिनेत्री प्रियांका सुंदर दिसत होती, तर निकने गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती जी तिने रुबी ब्रोच आणि सिल्क चुरीदार पँटसह मॅच केली होती.
देसी गर्लनं शेअर केला लग्नाचा अनुभव
प्रियांकानं अनंत राधिकाच्या विवाहातील तीन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत अनंत आणि राधिका दिसत आहेत. प्रियांकाने पती निक जोनासबरोबरचा दुसरा फोटो शेअर केला आहे. तिनं तिचा स्वतःचा तिसरा फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती जबरदस्त दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिले, "हे स्पष्ट आहे की मी चाट आणि लग्नाच्या वरातीत नाचणं खूप मिस केलं आहे. अनंत आणि राधिका या माझ्या ओळखीच्या सुंदर जोडप्याचं नवं आयुष्य साजरी करणारी ही एक खास रात्र होती, देव त्यांना सदैव आशीर्वाद देवो."