मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा मुंबईत परतली आहे. ती नुकतीच कलिना विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी प्रियांकानं राखाडी रंगाचा स्वेटपँट, राखाडी रंगाचा टॉप आणि कॅप घातली होती. कॅज्युअल लूकमध्ये ती देसी गर्ल नेहमीप्रमाणे देखणी दिसत होती. दरम्यान, प्रियांका चोप्राचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका कारमधून बसून असल्याची दिसत आहे. याशिवाय ती सिग्नलवर थांबते आणि तिच्या कार जवळ असलेल्या एका गरजू व्यक्तीला काही पैसे देते. या व्हिडिओमध्ये प्रियांकाचा चेहरा दिसला नाही. आता प्रियांकाच्या या मदतीनं अनेक चाहते तिचं सोशल मीडियाच्या माध्यामातून कौतुक करत आहेत.
प्रियांका चोप्राचा व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल : व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, 'हा व्हिडिओ मन जिंकणारा आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'प्रियांका ही एक चांगली व्यक्ती आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'ती एक क्वीन आहे.' तसेच या व्हिडिओवर अनेकजण हार्ट इमोजी शेअर करू 'देसी गर्ल'वर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिचा हा व्हिडिओ अनेकजण पसंत करत आहेत. सध्या प्रियांका ही भारतात तिच्या आगमी चित्रपटावर काम करत आहे. प्रियांका हैदराबादमध्ये तिच्या चित्रपटाच्या शूटिंग करत आहे. ती अनेकदा हैदराबाद ते मुंबई प्रवास करत असते.