मुंबई - Priyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला उपस्थित राहून मुंबईहून ऑस्ट्रेलियाला परतली आहे. 'देसी गर्ल' तिची मुलगी मालती मेरी जोनासबरोबरचा इंस्टाग्रामवर 14 जुलै रोजी एक फोटो शेअर केला आहे. बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये काम करणारी प्रियांका चोप्रा जोनासचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये मालती मेरी ही प्रियांकाच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "काही दिवसात 42 तासांहून अधिक काळ जगभर फिरल्यानंतर मला एवढीची गरज होती.'
प्रियांका चोप्रनं शेअर केला फोटो : आता या पोस्ट अनेकजण कमेंट्स करून यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "तू खरच खूप चांगली आई आहे, तू ज्याप्रकारे आपल्या मुलीची देखभाल करत ते खूप छान आहे." दुसऱ्या चाहत्यानं यावर लिहिलं, "एका आई ही आपल्या मुलांचा विचार नेहमीच करत असते." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "तू खूप काळजी घेणारी आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून प्रियांका आणि मालतीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या पोस्टला चाहत्यांनी खूप लाईक केलंय.