मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानं सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. फोटोत 'देसी गर्ल' ही स्वित्झर्लंडमधील हिमवर्षावाचा आनंद घेताना दिसत आहे. मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी प्रियांकानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर सुंदर झलक चाहत्यांना दाखवली. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती काळ्या लांब जाकीट आणि निळ्या को-ऑर्डर सेटमध्ये बर्फाच्छादित असलेल्या वातावरणात आनंद लुटताना दिसत आहे. 'देसी गर्ल'ची ही पोस्ट श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांच्या 'चांदनी' चित्रपटातील 'ओ मेरी चांदनी' या प्रसिद्ध गाण्याबरोबर जोडण्यात आली आहे.
प्रियांका चोप्रा स्वित्झर्लंडमधील हिमवर्षावाचा आनंद घेताना : प्रियांका बर्फाच्या वादळात शूटिंग करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रियांकानं लिहिलं, 'स्वित्झर्लंडमधील माझ्या शूटपासून थोडेसे बीटीएस. वास्तविक हिमवादळाच्या मध्यभागी. पण मजा आली.' प्रियांकाच्या या पोस्टवर तिचा पती-हॉलिवूड गायक निक जोनासनं प्रतिक्रिया दिली आहे. कमेंट करताना निकनं फायर इमोजीसह 'डॅम' असं लिहिलं आहे. तसेच प्रियांकाची चुलत बहिण मीरा चोप्रानं 'ओह गॉड... इतके हॉट बनणे बंद कर.' असं लिहिलंय. याशिवाय अभिनेत्री इलियाना डिसूझानं यावर लिहिलं,'पहिली निळी आउटफिट.' आता अनेक चाहते प्रियांकाच्या लूकबद्दल कौतुक करत आहेत. तसेच काहीजणांना ही पोस्ट पाहून चांदणी उर्फ श्रीदेवीची आठवण झाली आहे.