महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमावर पुन्हा 'आणीबाणी', 'या' निवडणूकीनंतर होणार रिलीज - KANGANA RANAUT EMERGENCY

Kangana Ranaut Emergency : कंगना रणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रिलीजला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा कंगना नव्यानं तयारी करत आहे.

Kangana Ranaut Emergency
'इमर्जन्सी' चित्रपट (Emergency film poster)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 16, 2024, 2:10 PM IST

मुंबई - अभिनेत्री आणि भाजपा नेत्या असलेल्या कंगना रणौतचा सर्वात वादग्रस्त 'इमर्जन्सी' हा राजकीय ड्रामा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. गेल्या वर्षभरापासून 'इमर्जन्सी'चे प्रदर्शन वारंवार, वेगवेगळ्या कारणांनी पुढं ढकललं जात आहे. शीख समुदायाने या चित्रपटाच्या आशयावर आणि दृष्यांवर आक्षेप व्यक्त केलाय. त्यामुळे कंगनाला हा चित्रपट रिलीज करणं अवघड होऊन बसलंय. या चित्रपटासाठी शीख समुदायातील काही संघटनांनी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (CBFC) धमकीही दिली होती. या धमकीनंतर सेन्सॉर बोर्डाने कंगना राणौतला 'इमर्जन्सी' चित्रपटाबाबत काही सूचना सुचवल्या होत्या. बरेच आढवेढे घेतल्यानंतर कंगनानं त्याला होकार दिला. तरीही 'इमर्जन्सी'ची नवी रिलीज डेट जाहीर झालेली नाही, पण आता 'इमर्जन्सी' रिलीज करण्याची तयारी पुन्हा एकदा कंगना रणौत करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'इमर्जन्सी' हा चित्रपट 13 नोव्हेंबरला चार जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर पंजाबमध्ये रिलीज होऊ शकतो. 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अटी मान्य केल्या आहेत, त्यामुळे पंजाब निवडणुका आणि निकालांनंतर आणीबाणीच्या रिलीजचा मार्ग मोकळा होऊ शकतो. बातमीनुसार, 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की, पंजाब निवडणुकीनंतर ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतील. 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून शीख समुदाय याविरोधात उभा ठाकला आहे.

इमर्जन्सी या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः कंगना रणौतनं केलं आहे. इमर्जन्सी हा चित्रपट 1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती, ती आजही चर्चेत आहे. कंगना रणौत अभिनीत आणि दिग्दर्शित 'इमर्जन्सी' हा चित्रपट आधी 14 जून आणि नंतर 6 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार होता, पण वादामुळे हा चित्रपट रिलीज थांबवण्यात आलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details