मुंबई - बॉलिवूड आणि गुजराती चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता टिकू तलसानिया यांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. मोठा झटका आल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. काही माध्यमांनी तर त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचंही म्हटलंय. परंतु, त्यांची तब्येत बरी असल्याचं जवळच्या व्यक्तीकडून समजतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय टिकू तलसानिया यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासात आढळून आलं की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येतंय.
टिकू तलसानिया हे चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. त्यांनी 'देवदास', 'जोडी नंबर १', 'शक्तीमान', 'कुली नंबर १', 'राजा हिंदुस्तानी', 'दरार', 'जुडवा', 'प्यार किया तो डरना क्या', 'राजू चाचा', 'मेला', 'अखियों से गोली मारे', 'हंगामा', 'ढोल', 'धमाल', 'स्पेशल 26' 'सर्कस', 'हंगामा २' अशा शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं आहे.