मुंबई -Phir Aayi HasseenTrailer: नेटफ्लिक्सचा आगामी चित्रपट 'फिर आयी हसीन दिलरुबा' बऱ्याचं दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजबद्दलची अपडेट आली आहे. निर्मात्यांनी आज 24 जुलै रोजी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा'चे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाचा ट्रेलर' : नेटफ्लिक्सवरील आगामी चित्रपट 'फिर आयी हसीन दिलरुबा' आता धमाकेदार कहाणीसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हसीन दिलरुबा' चित्रपटाचा सीक्वेल आहे. 'हसीन दिलरुबा'ला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळेच प्रेक्षक त्याच्या सीक्वेलसाठी आणखीनच उत्सुक आहेत. आता नेटफ्लिक्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चे नवीन पोस्टरवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "प्यार का दरिया एक है, लेकिन किनारे हैं दो... फिर आयी हसीन दिलरुबा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे."