मुंबई - Phir Aayi Hasseen Dillruba Trailer :अभिनेत्री तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि सनी कौशल अभिनीत रोमँटिक थ्रिलर चित्रपट 'फिर आयी हसीना दिलरुबा'चा आज 25 जुलै रोजी ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत. 'फिर आयी हसीना दिलरुबा'चा ट्रेलर प्रेम, विश्वासघात आणि नंतर खूनाच्या रहस्यानं भरलेला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 'फिर आयी हसीना दिलरुबा' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा चाहत्यांना खूप आवडला होता. 'हसीना दिलरुबा' चित्रपटामध्ये तापसी पन्नूचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला होता.
'फिर आयी हसीना दिलरुबा'चं ट्रेलर रिलीज :आता 'फिर आयी हसीना दिलरुबा'मध्ये तापसी पन्नू पुन्हा एकदा हत्येचे गूढ उकलण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केलं आहे. तापसीची बोल्ड स्टाईल आणि विक्रांत मॅसीची खुनी भूमिका आणि एक निष्पाप व्यक्ती म्हणून सनी कौशल या चित्रपटामध्ये दिसणार आहे. रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये विक्रांत मॅसी हा त्याच्या थरारक अंदाजात दिसत आहे. याशिवाय यावेळी या चित्रपटामध्ये अभिनेता जिमी शेरगिल देखील पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.