महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा' 'या' तारखेला नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित - Taapsee Pannu And Vikrant Massey - TAAPSEE PANNU AND VIKRANT MASSEY

Phir Aayi Hasseen Dillruba : तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी अभिनीत 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा सीक्वल सध्या चर्चेत आहे. जयप्रद देसाई दिग्दर्शित आणि कनिका ढिल्लन लिखित हा थ्रिलर चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.

Phir Aayi Hasseen Dillruba
फिर आयी हसीन दिलरुबा ((Photo: Instagram/Netflix India))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 5:34 PM IST

मुंबई - Phir Aayi Hasseen Dillruba : तापसी पन्नू , विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा'च्या रिलीजची वाट अनेकजण पाहत आहेत. दरम्यान या चित्रपटाचा टीझर व्हिडिओ समोर आला आहे. याशिवाय 'आयी हसीन दिलरुबा'च्या रिलीज डेटचीही माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियावर टीझरबरोबर, निर्मात्यांनी हे देखील सांगितले आहे की, हा चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी टीझर शेअर करताना लिहिलं, "दिलरुबाच्या नावानं 9 ऑगस्टची सुंदर संध्याकाळ. 'फिर आयी हसीन दिलरुबा' 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, फक्त नेटफ्लिक्सवर."

'फिर आयी हसीन दिलरुबा'चा टीझर रिलीज:टीझरमध्ये तापसीचं एक पोस्टर दिसते आणि आवज ऐकाला येतो "9 ऑगस्टला रक्त टपकणार, किलर मान्सूनचं होणार आगमन." यानंतर विक्रांत मॅसीचं पोस्टर दिसते आणि आवाज ऐकाला येतो, "9 ऑगस्टची सुंदर रात्र, दिलरुबासोबत." याशिवाय सनी कौशलच्या पोस्टर दिसते आणि आवज ऐकू येतो, "9 ऑगस्टला हृदय पिघळणार आणि प्रेमाचं विष पिणार." या चित्रपटाचं दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केलंय. 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा तापसी आणि विक्रांत पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची कहाणी कनिका ढिल्लन यांनी लिहिली आहे. तापसी आणि विक्रांत व्यतिरिक्त या चित्रपटात सनी कौशल आणि जिमी शेरगिल देखील दिसणार आहेत.

तापसी पन्नू सांगितलं होतं 'फिर आयी हसीन दिलरुबा'बद्दल :आनंद एल राय यांचे कलर यलो प्रॉडक्शन आणि भूषण कुमारची टी-सीरीजही या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2021 साली प्रदर्शित झालेला 'हसीन दिलरुबा' हा चित्रपट त्या वर्षी नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट होता. 'फिर आयी हसीन दिलरुबा'चे शूटिंग गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण झालंय. यादरम्यान तापसी म्हणाली होती की, "हा एक सीक्वेल आहे, जो मागील कहाणीला पुढे नेईल. पुढच्या कहाणीत, राणीमध्ये थोडे अधिक प्रेम, थोडे अधिक धैर्य आणि थोडे अधिक वेडेपणा पाहायला मिळणार आहे." यावेळी तापसीनं म्हटलं होतं की, "प्रेम वेडेपणानं केले जात नाही? नाती जाणीवपूर्वक जपली जातात." यावेळी या चित्रपटामध्ये काही वेगळ पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details