मुंबई - 'OG' New Poster of Emraan Hashmi :अभिनेता इमरान हाश्मीचा 24 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त पवन कल्याण 'ओजी'च्या टीमनं एक पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये इमरानचा टपोरी लूक दिसत आहे. 'ओजी' चित्रपटात इमरान हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये इमराननं काळ्या रंगाचा काळा शर्ट घातला आहे. याशिवाय मनगटावर त्यानं सोन्याचं कड आणि बोटात काही अंगठ्या घातल्या आहेत. या तो पोस्टरमध्ये सिगार पेटवताना दिसत आहे. प्रोडक्शन हाऊस डीव्हीव्ही (DVV) एंटरटेनमेंटनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टर शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिलं, ''हॅपी बर्थडे डेडलीस्ट ( इमरान हाशमी) ओएमआई भाऊ".
इमरान हाश्मीचा लूक : जून 2023 मध्ये, 'ओजी' निर्मात्यांनी इमरानचा फर्स्ट लुक रिलीज होता केला. यावर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होत, ''जेव्हा आमच्याकडे ओजी असेल, तेव्हा आमच्याकडे एक बदमाशही असला पाहिजे जो शक्तिशाली असेल. तुमची सर्वांची ओळख करून देत आहे, इमरान हाश्मी.'' यानंतर इमरानच्या चाहत्यानं या पोस्टवर या चित्रपटाबद्दल उसुक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. इमरान हाश्मीचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं होत की, ''रोमँटिक हिरो गँगस्टर बनण्यासाठी तयार आहे.'' दुसऱ्यानं या पोस्टवर लिहिलं होत, "भाऊ तू खूप जबरदस्त दिसतोय." आणखी एकानं लिहिलं, "भाऊची झलक अनोखी आहे." काही लोकांनी त्याला विलक्षण असल्याचं म्हटलं होत.