मुंबई - Vinesh Phogat :अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि सारा अली खान यांनी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधून भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. विनेशला प्रोत्साहन देण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर नोट शेअर केल्या आहेत. याआधी आलिया भट्ट, रणवीर सिंग, स्वरा भास्कर, करीना कपूर खान, मलायका अरोरा, तापसी पन्नू यांच्यासह अनेक कलाकारांनी विनेशला पाठिंबा दिला होता.
अनुष्का शर्मा आणि सारा अली खान यांची प्रतिक्रिया : विनेश फोगटच्या अपात्रतेनं आणि निवृत्तीच्या घोषणेनं अनुष्का शर्माला दु:ख झालंय. तिनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर विनेशसाठी एक विशेष नोट शेअर केली आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आम्ही सर्व दुःखी आहोत, मी कल्पनाही करू शकत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात असाल. तुम्ही खरे चॅम्पियन आहात." सारा अली खानही विनेशच्या पाठिंबा देत तिनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॅप्शनमध्ये विनेशसाठी लिहिलं आहे, "तू आपल्या सर्वांसाठी खरी चॅम्पियन आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे."
करण जोहर : चित्रपट निर्माता करण जोहरनं विनेश फोगटसाठी एक खूप खास संदेश दिला आहे. त्यानं इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्यासाठी लिहिलं, "विनेश फोगटनं तिचं नाव इतिहासात नोंदवलं आहे. तिची चिकाटी, तिची ताकद आणि अजिंक्यतेची भावना हे तिचं पदक आणि सोने आहे. लीजेंड पीरियड." अनिल कपूर, सुनील शेट्टी, वरुण धवन, सोनू सूद यांच्यासह अनेक स्टार्सनी विनेश फोगटचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.