मुंबई - Parineeti Chopra :बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अमर सिंग चमकिला' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. 'अमर सिंग चमकिला' या चित्रपटानं जबरदस्त कामगिरी केली आहे. दरम्यान आता परिणीती या यशाबद्दल आभार मानण्यासाठी बुधवारी म्हणजेच 17 एप्रिल रोजी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. चित्रपटाच्या यशाबद्दल तिनं बाप्पाचं आभार मानलं आहे. याशिवाय तिनं बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर प्रसादाचं वाटपही केला आहे. परिणीती 'अमर सिंग चमकीला'मध्ये गायक दिलजीत दोसांझबरोबर मुख्य भूमिकेत दिसली आहे. पंजाबचा रॉकस्टार आणि त्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार अमरसिंग चमकिलाची कहाणी खूप अप्रतिम आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
परिणीती चोप्रा पोहचली सिद्धिविनायक मंदिरात : या चित्रपटात परिणीतीनं अमर सिंग चमकिलाची पत्नी अमरजोत कौरची भूमिका साकारली आहे. 'अमर सिंग चमकीला' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटामध्ये परिणीतीनं खूप सुंदर अभिनय केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात ती पांढऱ्या सुटमध्ये दिसत आहे. याशिवाय ती हातात मोदक घेऊन तिथे उपस्थित असलेल्या पापाराझीला प्रसाद देत आहे. अलीकडेच परिणीतीनं तिच्या भूमिकेबद्दल खुलासा केला की, तिच्या काही बॉलिवूडमधील सहकलाकारांनी तिला म्हटलं होत की, जर तिनं ही भूमिका साकरली तर तिचं चित्रपटसृष्टीमधील करिअर संपेल, ही भूमिका नाकारण्याचा करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.