महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पूनम ढिल्लनच्या घरातून हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याप्रकरणी पेंटरला अटक - POONAM DHILLON

अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

Poonam Dhillon
पूनम ढिल्लन (पूनम ढिल्लन (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 8, 2025, 3:20 PM IST

मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या घरी चोरीची घटना घडल्याचं समजत आहे. चोरट्यानं पुनम यांच्या घरातून हिऱ्याचा हार, रोख रक्कम आणि अमेरिकन डॉलर चोरून नेले. आता पूनमच्या घरातून गेलेल्य गोष्टी त्यांना परत मिळाल्या आहेत. मुंबई पोलिसांनी 37 वर्षीय चित्रकार समीर अन्सारीला खारमधील पूनम ढिल्लनच्या घरातून हिऱ्याचा हार, 35,000 रुपये रोख आणि अमेरिकन डॉलर्स चोरल्याप्रकरणी अटक केली आहे. रंगकाम करण्यासाठी आलेल्या अन्सारीनं उघड्या कपाटातून मौल्यवान वस्तू चोरल्या असल्याचं कबूल केलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माहिती सांगितली आहे.

पूनम ढिल्लन यांच्या घरात चोरी :मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना म्हटलं, "आरोपीला 6 जानेवारीला अटक करण्यात आली होती. ही अभिनेत्री मुख्यतः जुहू येथे राहते. तर त्यांचा मुलगा अनमोल खार येथील घरात राहतो. पूनम ढिल्लन कधी कधी इथे राहायची." आरोपी अन्सारी हा फ्लॅट रंगविण्यासाठी 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान पूनम ढिल्लनच्या घरी आल्याचं तपासात निष्पन्न झालं. उघड्या कपाटाचा फायदा घेत मौल्यवान वस्तू चोरी करून हा आरोपी फरार झाला होता. याशिवाय या आरोपीनं काही पैशांची पार्टी देखील केली. पोलिसांनी अन्सारीला बोलवून चौकशी केली असता, त्यानं गुन्हा कबुल केला.

अभिनेत्री पूनम ढिल्लनची कारकीर्द :पूनम ढिल्लननं आपल्या अभिनयानं चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. पूनम ढिल्लननं 1977 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली होती. 1980च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक पूनम ढिल्लन बनली होती. तिनं तिच्या करिअरची सुरुवात 'त्रिशूल' या चित्रपटातून केली होती. यामध्ये तिची छोटीशी भूमिका होती. यानंतर तिनं 'नूरी 'या चित्रपटात काम केलं. या चित्रपटानंतर तिला बॉलिवूडमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये 'पत्थर के इंसान', 'जय शिव शंकर', 'रमैया वस्तावैय्या', 'बटवारा' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान पूनम ढिल्लन अखेरची सोनाली सेगल आणि सनी सिंगबरोबर 'जय मम्मी दी'मध्ये दिसली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details