महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ऑस्कर 2025च्या यादीत असलेले 'हे' 7 भारतीय चित्रपट पाहा ओटीटीवर - OSCARS 2025

ऑस्कर 2025च्या स्पर्धकांच्या यादीत 7 भारतीय चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. तुम्ही हे चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर पाहू शकता.

ऑस्कर 2025
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 8, 2025, 2:07 PM IST

मुंबई : 97व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला फक्त दोन महिने उरले आहेत. द ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं यंदाच्या ऑस्करसाठी 323 चित्रपटांची यादी तयार केली आहे. यात 207 चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत आहेत. 7 भारतीय चित्रपटांनीही स्पर्धकांच्या यादीत आपलं स्थान निश्चित केलंय. आता तुम्ही हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. ऑस्करसाठी निवडलेल्या हे चित्रपट कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहेत, याबद्दल जाणून घ्या...

ऑस्करसाठी निवडले गेले 7 भारतीय चित्रपट

'कांगुवा' (तमिळ)

'आदुजीविथम: द गोट लाइफ' (हिंदी)

'संतोष' (हिंदी)

'स्वातंत्र्य वीर सावरकर' (हिंदी)

'ऑल वी इमेजिन ऐज लाइट' (मल्याळम-हिंदी)

'गर्ल्स विल बी गर्ल्स' (हिंदी-इंग्रजी)

'पुतुल' (बंगाली)

'कांगुवा' :ऑस्कर स्पर्धकांच्या यादीत तमिळ चित्रपट 'कांगुवा'नं देखील आपलं स्थान निश्चित केलं आहे. या चित्रपटामध्ये साऊथ स्टार सूर्या आणि बॉबी देओल यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ऑस्कारसाठी जात असल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 'कांगुवा' चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 14 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. 'कांगुवा' चित्रपट अ‍ॅमेजन प्राइमवर उपलब्ध आहे.

'आदुजीविथम: द गोट लाइफ' : ब्लेसी दिग्दर्शित आणि पृथ्वीराज सुकुमारनची चित्रपट, 'आदुजीविथम: द गोट लाइफ' नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल. पृथ्वीराज सुकुमारन व्यतिरिक्त या चित्रपटात जिमी जीन-लुई, केआर गोकुल, तालिब अल बलुशी आणि अमला पॉल सारखे दिग्गज कलाकार आहेत.

'संतोष' : संध्या सुरीचा 'संतोष' हा चित्रपट इंडियन विजनला समोर ठेवून निर्मित करण्यात आला आहे. या चित्रपटाला ऑस्कर 2025 मध्ये प्रवेश मिळाला आहे. हा चित्रपट मूबी प्लेटफॉर्मवर पाहता येईल.

'स्वातंत्र्य वीर सावरकर' :अभिनेता रणदीप हुड्डा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' 2024च्या फ्लॉप चित्रपटांमध्ये सामील आहे. या चित्रपटानं ऑस्कर 2025च्या यादीत आपले स्थान निर्माण केलंय. हा चित्रपट झी 5वर पाहू शकता. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

'ऑल वी इमेजिन ऐज लाइट' :'ऑल वी इमेजिन ऐज लाइट' चित्रपट डिज्नी हॉटस्टारवर उपलब्ध आहे. गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळालेला हा चित्रपट एका नर्सच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये दिव्या प्रभा, कनी कुसरुति, हृदु हारून, छाया कदम आणि टिंटूमोल जोसेफ यांनी दमदार अभिनय केला आहे.

'गर्ल्स विल बी गर्ल्स' :सुचि तलाटी दिग्दर्शित 'गर्ल्स विल बी गर्ल्स', ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर इंग्रजी सबटायटल्ससह हिंदी आणि मल्याळममध्ये उपलब्ध आहे. या चित्रपटामध्ये मुलगी आणि आई यांच्यातील सुंदर कहाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्यात आली आहे.

'पुतुल' :इंदिरा धर यांचा 'पुतुल' हा ऑस्करसाठी निवडलेला पहिला बंगाली चित्रपट आहे. गेल्या वर्षी, मार्चे डू फिल्म श्रेणी अंतर्गत हा चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाला होता. हा बंगाली चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

हेही वाचा :

  1. 'कांगुवा' ऑस्कर 2025 मध्ये दाखल, 'हे' 5 भारतीय चित्रपटही यादीत सामील...
  2. 'लापता लेडीज' ऑस्करमधून बाहेर, शॉर्ट फिल्म 'अनुजा'ची झाली निवड...
  3. ऑस्कर २०२५ च्या शर्यतीत 'लापता लेडीज'ने भारतीय सिनेसृष्टीतील २८ चित्रपटांना टाकले पिछाडीवर - Lapata Ladies nominated for Oscars

ABOUT THE AUTHOR

...view details