महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

निवेदिता सराफ यांची नवीन मालिका 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत.' होणार 'या' दिवशी प्रसारित - NIVEDITA SARAF

निवेदिता सराफ या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत.' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येत आहे. यापूर्वी त्या 'अग्गाबाई सासूबाई' या मालिकेत दिसल्या होत्या.

nivedita saraf
निवेदिता सराफ (निवेदिता सराफ - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 21, 2024, 3:09 PM IST

मुंबई :छोट्या पडद्यावर आता एक नवीन मालिका चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहणाऱ्या 'स्टार प्रवाह'वर निवेदिता सराफ या पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखविण्यासाठी सज्ज आहे. आता नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांचं मनोरंजन 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत.' या मालिकतून होईल. आता सोशल मीडियावर या नवीन मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. स्टार प्रवाहवर या मालिकेची पहिली झलक सप्टेंबर महिन्यात आली होती. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत.' मालिकेच्या या पहिल्या प्रोमोत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेता मंगेश कदम हे दोघेही प्रमुख भूमिकेत दिसले होते.

निवेदिता सराफ यांची नवीन मालिका : 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत.' मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम हे प्रमुख भूमिके दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता सोशल मीडियावर या मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका 2 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी 2.30 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. याशिवाय या मालिकेत आणखी कोण कलाकार दिसणार, हे देखील काही दिवसात माहित होईल. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत.'चा प्रोमो देखील चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या प्रोमोला पसंत करत आहेत.

कसा आहे प्रोमो ? : 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत'च्या प्रोमोमध्ये आई-बाबा आपल्या मुलांसाठी किती कष्ट करतात, हे दाखविण्यात आलं आहे. प्रोमोत मंगेश कदम यांचा निवृत्तीचा दिवस असल्याचं दाखविलं गेलं आहे. प्रोमोची सुरुवातीला निवेदिता सराफ या घरातील काम आणि आपल्या मुलांसाठी जेवणाचा डब्बा पॅक करताना दिसतात. मंगेश कदम हे निवेदिता सराफ यांना म्हणतात, "माझा डब्बा" यानंतर एका छोट्या मुलीचा आवाज येतो आणि त्या तिथून निधून जातात. यानंतर मंगेश कदम हे घराच्या बाहेर जाताना दिसतात आणि निवेदिता सराफ या त्यांना आवज देतात. प्रोमोत पुढं मंगेश कदम निवृत्तीनंतर गावी जाऊ असल्याचं निवेदिता सराफ (पत्नी) यांना म्हणताना दिसते. यावर निवेदिता सराफ या आपल्या मुलांची काळजी करताना दिसतात. आता निवेदिता सराफ यांची नवीन भूमिका प्रेक्षकांना किती पसंत पडेल, हे काही दिवसातच कळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details