मुंबई- krunal pandya :भारतीय क्रिकेटर क्रुणाल पांड्यानं त्याचा भाऊ हार्दिक पांड्यासाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकनं या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्यानं, ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.
क्रुणाल पांड्यानं पोस्टमध्ये त्याच्या भावाबरोबरचं नातं आणि क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या संघर्षांबद्दल पोस्टमध्ये लिहिलं आहे. क्रुणालच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता हार्दिक पांड्याची पत्नी नताशाची प्रतिक्रिया ही चांगलीच चर्चेत आहे. भाऊ हार्दिक पांड्याच्या यशाबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर करताना क्रुणालनं लिहिलं, "हार्दिक आणि मी क्रिकेट खेळून जवळपास एक दशक झाले आहे. गेले काही दिवस आमच्यासाठी खूप कठीण गेले आहेत. जेव्हा भारतीय संघ जिंकला, तेव्हा प्रत्येक देशवासियांप्रमाणे मीही माझ्या संघाचा विजय साजरा केला. हा खास क्षण मोकळेपणानं जगलो. तुमच्या लोकांच्या प्रार्थनेनं भारताला विजय मिळवून दिला."
क्रुणाल पांड्यानं पोस्ट केली शेअर : याशिवाय त्यानं पुढं लिहिलं, "T20 विश्वचषकातील भारताचा ऐतिहासिक प्रवास पुन्हा संस्मरणीय झाला. लोकांच्या निरर्थक कमेंट्सपासून माझ्या भावाला खूप काही सहन करावे लागले. शेवटी आम्ही सर्व विसरलो. मात्र तो देखील एक माणूस आहे. त्याला भावना आहेत." आता नताशानं या पोस्टला लाईक केले. आता यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. नताशा स्टॅन्कोविक आणि हार्दिक पांड्या त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या बातम्या समोर आल्यावर अनेकांनी नताशा ट्रोल केलं होतं. याआधी हार्दिक हा आईपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कप्तान झाल्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल केलं होतं.
हार्दिक पांड्याचे बालपणीचा फोटो व्हायरल : मुंबई इंडियन्सचा आधी रोहित शर्मा हा कर्णधार होता. रोहित शर्माचे अनेक चाहते आहेत. दरम्यान कृणाल पांड्यानं त्याच्या भावाचा बालपणीचा फोटो शेअर केले आहेत. याशिवाय त्यानं आत देखील फोटो पोस्ट केले आहेत. आता कृणाल पांड्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून हार्दिक पांड्याचे कौतुक करताना दिसत आहे.
हेही वाचा :
- 'मुंज्या' चित्रपटात कोल्हापूरच्या आयुष उलगड्डेचा धुमाकूळ, अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना कसं मिळविल यश? - munjya film News
- बिग बॉस ओटीटीमध्ये राडा, विशाल पांडेच्या 'त्या' शब्दामुळे अरमाननं मारली झापड - Bigg Boss ott 3
- अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील जस्टिन बीबरनं शेअर केले खास फोटो आणि व्हिडिओ - Anant Radhika Sangeet Nigh