महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नाना पाटेकर पुन्हा एकदा दमदार परफॉर्म्ससाठी सज्ज, 'वनवास'चा दमदार टिझर रिलीज

Vanvas teaser out : नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा यांच्या भूमिका असलेला अनिल शर्मा दिग्दर्शित 'वनवास' चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.

Vanvas teaser out
'वनवास'चा दमदार टिझर (ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 30, 2024, 1:03 PM IST

मुंबई - अभिनेता नाना पाटेकरच्या अभिनयाचे लाखो लोक चाहते आहेत. त्याची पडद्यावरची एन्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक डोळे लावून बसलेले असतात. अलीकडे त्याचा दमदार चित्रपट आला नसल्यामुळे अनेकांना चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय. पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. नाना पाटेकर रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज झाला असून त्याच्या 'वनवास' चित्रपटाचा टिझर निर्मात्यांनी रिलीज केला आहे.

अभिनेते नाना पाटेकरचा उत्कर्ष शर्माबरोबरचा 'वनवास' हा नवीन चित्रपट डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी, निर्मात्यांनी चित्रपटाचा टिझर रिलीज केला असून या मनोरंजक टिझरनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "कुछ कहानीं ले जाती है हमें अपनों के करिब! या सणासुदीच्या काळात भावनांच्या रोलरकोस्टर राईडसाठी तयार व्हा," असं निर्मात्यांनी टीझरला कॅप्शन दिलं आहे. टिझरमध्ये नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा वडील आणि मुलाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यातील कौटुंबीक बंध, इमोशन्स दाखवणारा हा चित्रपट पडद्यावर झळकणार आहे.

अलीकडेच, एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनबद्दल सांगितलं. "आम्ही वाराणसी आणि शिमला येथे शूटिंग केलं आहे. 'वनवास'चा सर्वात चांगला भाग म्हणजे नाना पाटेकर आणि उत्कर्षची दृश्ये आणि त्यांची उत्तम केमिस्ट्री," असं शर्मा यांनी सांगितलं.

"रामायण आणि वनवास या वगवेगळ्या गोष्टी आहेत. कलियुगातील रामायणामध्ये आपले लोक आपल्याला वनवास घ्यायला भाग पाडतात", असं अनिल शर्मा यांनी चित्रपटाविषयी बोलताना पुढं सांगितलं. झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश के.आर. बन्सल म्हणाले, "अशा विलक्षण चित्रपटाच्या मागे उभे राहताना आम्हाला आनंद होत आहे. 'वनवास' हा चित्रपट आधुनिक काळातील कौटुंबिक गतिशीलतेचा एक नवीन अनुभव देतो आणि आम्हाला विश्वास आहे की तो प्रेक्षकांसाठी खरोखरच अनोखा अनुभव असेल." अनिल शर्मा लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित 'वनवास' हा झी स्टुडिओजचा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार आहे. नाना पाटेकरचा दमदार परफॉर्मन्ससाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक पर्वणी असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details