महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाची लग्नाआधी 'इफ्फी 2024' मध्ये दिमाखदार एन्ट्री - NAGA CHAITANYA AND SOBHITA IN IFFI

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची चर्चा सुरू असतानाच ही जोडी इफ्फीमध्ये दिसली. नागार्जुनसह संपूर्ण कुटुंब इफ्फीच्या सोहळ्याला हजर होते.

Nagarjuna with Naga Chaitanya and Shobhita Dhulipala
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालासह नागार्जुना ((Photo: IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 7:59 PM IST

मुंबई - साऊथचा लोकप्रिय स्टार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी 21 नोव्हेंबर रोजी इंरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडियाच्या ( IFFI ) सोहळ्यासाठी हजेरी लावली. यावेळी या जोडीनं नागार्जुन, अमला अक्किनेनी आणि सुशांत यांच्या बरोबर रेड कार्पेटवर वॉक केला. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी त्यांचं स्वागत या सोहळ्यात झालं. त्यांचे लग्न 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये होणार आहे.

खरंतर 2024 च्या गोवा इफ्फी महोत्सवात अक्किनेनी नागेश्वर राव यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. त्यामुळे संपूर्ण अक्किनेनी परिवार आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी येथे दाखल झाला आहे. या कार्यक्रमात शोभिता पीच सलवार सूटमध्ये दिसली, तर नागा चैतन्य निळ्या ब्लेझर आणि ट्राउझर्समध्ये खूपच आकर्षक दिसत होता.

IFFI गोवामध्ये 22 नोव्हेंबर रोजी अक्किनेनी नागेश्वर राव (ANR) यांचे जीवन आणि त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अक्किनेनी नागेश्वर राव यांनी वडील आणि अभिनेता म्हणून त्याच्यावर कसा प्रभाव टाकला यावर नागार्जुन चर्चा करेल. त्यांची कारकीर्द आणि त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा यावर विशेष शताब्दी कार्यक्रम सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे आमंत्रण नुकतेच सोशल मीडियावर लीक झाले होते. व्हायरल झालेल्या फोटोतील गिफ्ट बास्केटमध्ये लाकडी गुंडाळी, पॅकेट, मिठाईच्या वस्तू आणि कापडाचा तुकडा यांचा समावेश होता.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या वर्षी ८ ऑगस्टला एंगेजमेंट झाले होते. त्यांचा हा एंगेजमेंट सोहळा एक खाजगी कार्यक्रम होता. यासाठी फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लवकरच हे कपल त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार आहे. नागा चैतन्य आणि त्याची पहिली पत्नी सामंथा रुथ प्रभू यांचा घटस्फोट झाल्यानंतर संपूर्ण अकिनेनी कुटुंबीय नागाच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यानंतर त्याचे आणि शोभिताच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आणि आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details