महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

संगीतकार एआर रहमानच्या आयुष्यात गोंधळ, लग्नाच्या 29 वर्षांनंतर तुटलं नात... - AR RAHMAN

संगीतकार एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानोनं लग्नाच्या 29 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

ar rahman
एआर रहमान (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 20, 2024, 10:23 AM IST

मुंबई - ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान हे लग्नाच्या 29 वर्षांनंतर पत्नी सायरा बानोपासून वेगळे होत आहेत. रहमान आणि सायराच्या वकिलानं एक जाहीर निवेदन आता सोशल मीडियावर जारी करून याबाबत सांगितलं आहे की, या जोडप्यानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. रहमान यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, 'लग्नाच्या अनेक वर्षांनी मी माझा पती एआर रहमानपासून विभक्त होण्याचा कठीण निर्णय घेत आहे. आमच्या नात्यातील भावनिक तणावानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत असूनही, आम्हाला आढळले आहे की, तणाव आणि अडचणींमुळे आमच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे, ज्याला आता कोणी कमी करू शकत नाही. त्यामुळे हा कठिण निर्णय घेत आहे.'

एआर रहमान यांची पोस्ट व्हायरल :घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, एआर रहमाननं 20 नोव्हेंबर रोजी एक्सवर ट्विट करत लिहिलं, 'आम्हाला आशा होती की, आम्ही 30 वर्षे पूर्ण करू, परंतु… सर्व गोष्टींचा अंत असतो. तुटलेल्या हृदयाच्या भाराखाली देवाचे सिंहासन देखील हलू शकते. तरीही, या तुकड्यांमध्ये आपण अर्थ शोधतो, मात्र हे तुकडे पुन्हा त्यांची जागा शोधू शकत नाहीत. मित्रांनो, आम्ही या नाजूक काळातून जात असताना आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.' आता सोशल मीडियावर एआर रहमानच्या घटस्फोटाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. एआर रहमान त्यांच्या पोस्टवर अनेकजण आता प्रतिक्रिया देत आहेत.

एआर रहमान यांनी सांगितला किस्सा : एआर रहमान आणि सायरा यांचा विवाह 1995 मध्ये झाला होता. सिमी ग्रेवालच्या मुलाखतीत एआर रहमाननं त्यांच्या लग्नाविषयीचा एक किस्सा शेअर केला होता. यात त्यांनी म्हटलं होतं. "माझ्याकडे वधू शोधण्यासाठी वेळ नव्हता. पण ती लग्न करण्याची योग्य वेळ होती. यानंतर मी आईला आपल्यासाठी वधू शोधण्यास सांगितलं.' एआर रहमान आणि सायरा यांच्या रुढी आणि परंपरामध्ये खूप फरक असूनही, त्याच्यात चांगले संबंध होते. मात्र, आता ते वेगळे झाले आहेत. एआर रहमान आणि सायरा यांना खतिजा, रहीमा आणि अमीन अशी तीन मुले आहेत. यावेळी त्यांची मुले या कठिण काळात आपल्या पालकांना साथ देत आहेत. खतिजा रहमाननं एक इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे. यात तिनं लिहिलं, 'आम्ही प्रत्येकजणांना विनंती करतो की, या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.'

एआर रहमानचं आयुष्य :रहमान यांनी 1989मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला. त्यांचं पूर्वीचं हिंदू नाव दिलीप कुमार होत. यानंतर त्यांनी त्याचं नाव बदलवून अल्लाह रक्खा रहमान असं ठेवलं. रहमान यांची पत्नी सायरा बानो अभिनेता रशीन रहमानच्या नातेवाईक आहेत. 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी ऑस्कर जिंकणारे संगीतकार एआर रहमान यांनी अनेक सुपरहिट गाणी चित्रपटसृष्टीला दिली आहेत.

हेही वाचा :

  1. संगीतकार प्रीतम आणि एआर रहमान यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
  2. एआर रहमान यांनी पूर्ण केला 'रायन'चा बॅकग्राऊंड स्कोअर, धनुषनं शेअर केली पोस्ट - AR Rahman
  3. संगीतकार आणि गायक ए.आर.रहमान यांनी केला होता आत्महत्येचाही विचार

ABOUT THE AUTHOR

...view details