महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

होमी अदजानियाचा गूढ, कॉमेडी, रोमान्स थ्रिलर 'मर्डर मुबारक'चा ट्रेलर लॉन्च - होमी अदजानिया

Murder Mubarak Trailer : 'मर्डर मुबारक' या आगामी थ्रिलरच्या निर्मात्यांनी मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले. होमी अदजानिया दिग्दर्शित, या चित्रपटात पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर, सारा अली खान, विजय वर्मा आणि आणखी काही कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मर्डर मुबारक' 15 मार्चपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध आहे.

Murder Mubarak Trailer
'मर्डर मुबारक'चा ट्रेलर लॉन्च

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 3:40 PM IST

मुंबई - Murder Mubarak Trailer : सस्पेन्स थ्रिलर 'मर्डर मुबारक'च्या बहुप्रतिक्षित ट्रेलरचे मंगळवारी लॉन्चिंग करण्यात आले. अनुजा चौहानच्या 'क्लब यू टू डेथ' या कादंबरीवर आधारित, हा चित्रपट 15 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स निर्मित, 'मर्डर मुबारक' रहस्य, कॉमेडी, रोमान्स आणि सस्पेन्स यांचे उत्कृष्ट मिश्रण असणारा चित्रपट आहे.

पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर, सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, टिस्का चोप्रा, आणि सुहेल नय्यर या कलाकारांसह, मर्डर मुबारकचा ट्रेलर संशयितांची एक वेधक कथा सादर करतो. जसजसे रहस्ये उलगडत जातात आणि सत्ये बाहेर पडतात, तसतसे कथानक अधिक घट्ट होत जाते. यामध्ये पंकज त्रिपाठी एक गैर-पारंपारिक पोलीस म्हणून गुप्त गुंतागुतींनी भरलेल्या जगाचा शोध घेताना दिसतो.

पंकज त्रिपाठीच्या बरोबरीनं, विजय वर्मा एका वकिलाची व्यक्तिरेखा साकारत आहे जो प्रो-बोनो केसेस चालवतो. दिल्लीच्या एलिट क्लब सीनच्या पार्श्वभूमीवर सेट केलेला, 'मर्डर मुबारक'चा ट्रेलर त्याच्या पात्रांच्या एकमेकांना छेद देणाऱ्या जगण्याची झलक दाखवत एक थ्रिलिंग अनुभव देतो.

यापूर्वी दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी या प्रनव्या कल्पासाठी आपला उत्साह व्यक्त केला होता. वैविध्यपूर्ण आणि प्रतिभावान कलाकारांना हायलाइट करून, प्रत्येकाने त्यांच्या विलक्षण पात्रांना जिवंत केले, असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रोतीम सेनगुप्ता आणि गझल धालीवाल यांनी रचलेल्या आकर्षक कथनाटी निर्मिती शारदा कार्की जलोटा आणि पूनम शिवदासानी यांनी केली आहे. मनोरंजनाचा एक अप्रतिम मिश्रण असलेला हा 'मर्डर मुबारक'चा ट्रेलर सस्पेन्स थ्रिलर रसिकांसाठी एक वेगळा अनुभव असू शकतो. 'मर्डर मुबारक' हा चित्रपट 15 मार्चपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध आहे.

हेही वाचा -

  1. करीना, तब्बू, क्रिती स्टारर 'क्रू' चित्रपटातील 'नैना' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ
  2. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिज्मबद्दल कंगना रनौतच्या दाव्यावर इमरान हाश्मीनं केला खुलासा
  3. एसएस राजामौलीच्या आगामी 'जंगल अ‍ॅडव्हेंचर' चित्रपटात महेश बाबूचे 8 वेगळे लूक्स

ABOUT THE AUTHOR

...view details