मुंबई - Mirzapur Season 3 Trailer :'मिर्झापूर 3'ची नुकतीच पोस्टरसह घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासून अनेकजण या वेब सीरीजच्या रिलीजची प्रतीक्षात करत आहेत. ही वेब सीरीज 5 जुलै रोजी रिलीज होणार आहे. याआधी या क्राईम थ्रिलर सीरिजच्या ट्रेलरची रिलीजची डेट समोर आली आहे. मिर्झापूर सीझन 3'चा ट्रेलर 20 जूनला रिलीज होणार असल्याचं समजत आहे. निर्मात्यांनी याची घोषणा केली नसली तरी 'मिर्झापूर सीझन 3'च्या ट्रेलरची ही रिलीज डेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरमध्ये एक मोठा धक्कादायक खुलासा होणार असल्याचं बोललं जात आहे. 'मिर्झापूर सीझन 3' ॲमेझॉन प्राइमवर रिलीज होणार असून ही वेब सीरीज धमाका करेल असं सध्या दिसत आहे.
चाहत्यांनी केली मुन्ना भैय्याची आठवण : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टरच्या पोस्टमध्ये काही चाहते पोस्ट करू आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यामध्ये एका चाहत्यानं लिहिलं, "मुन्ना भैय्याला यावं लागेल कारण तो अमर होता." दुसऱ्या एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "मुन्ना भैयाशिवाय 'मिर्झापूर' कंटाळवाणं आहे." आणखी एकानं लिहिलं, "मुन्ना भैया नाही तर मी ही सीरीज बघणार नाही." याशिवाय काहीजण पोस्टवर 'मिर्झापूर 3'साठी उत्सुक असल्याचं सांगत आहेत. 'मिर्झापूर'मध्ये दिव्येंदु शर्मानं मुन्ना भैय्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. आता सोशल मीडियावर अनेकजण मुन्ना भैय्याची आठवण करताना दिसत आहेत.