महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'मिर्झापूर 3' 'मुन्ना भैया' दिव्येंदूनं केला खुलासा, नवीन हंगामाचा नसणार भाग - Mirzapur 3 - MIRZAPUR 3

Mirzapur 3 : 'मिर्झापूर 3' वेब सीरीजबद्दल एक अपडेट समोर आली आहे. या वेब सीरीजमध्ये दिव्येंदू शर्मा (मुन्ना भैय्या) दिसणार नाही. याचा खुलासा खुद्द दिव्येंदूनं केला आहे.

Mirzapur 3
मिर्झापूर 3

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 10:58 AM IST

मुंबई - Mirzapur 3 :'मिर्झापूर' आत्तापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय वेब सीरीजपैकी एक आहे. 'मिर्झापूर' या वेब सीरीजच्या दोन्ही भागांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. आता 4 वर्षांनंतर 'मिर्झापूर 3' येणार आहे, त्यामुळे सगळेच सीरीजची वाट पाहात आहेत. अनेकांना या सीरीजची कहाणी आणि पात्रं खूप आवडली आहेत. याशिवाय या सीरीजममध्ये सर्व पात्रांनी चांगला अभिनय केला आहे. 'मिर्झापूर' सीरीजमधील मुन्ना भैय्याचं पात्र खूप लोकप्रिय झालं आहे. मात्र आता , मुन्ना भैय्याचं पात्र 'मिर्झापूर 3' मध्ये दिसणार नाही. दिव्येंदू शर्मा 'मिर्झापूर' वेब सीरीजमध्ये मुन्ना भैय्याची भूमिका साकारत होता.

'मिर्झापूर 3'वेब सीरीज :'मिर्झापूर 2' सीझननंतर आता तिसऱ्या सीझनमध्ये त्याचे पात्र काढून टाकण्यात आलं आहे. याचा अंदाज वेब सीरीजच्या घोषणेनंतर बांधला जात होता. आता दिव्येंदूनं खुद्द याबद्दल पुष्टी केली आहे. दिव्येंदूनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, ''जेव्हा मी या व्यक्तिरेखेमध्ये होतो तेव्हा माझ्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होत होता. आपण कोणत्याही व्यक्तिरेखेचा अति-रोमँटिकीकरण करू नये. हे इतके अवघड आहे की आपण कोणत्या झोनमध्ये आहात हे देखील आपल्याला माहित होत नाही. पण त्यातून बाहेर आल्यावर अंधार जाणवतो. दिव्येंदू 'मिर्झापूर 3'वेब सीरीजमध्ये नसल्यामुळे तो निराश झाला आहे.

'मिर्झापूर'चा तिसरा सीझन कधी रिलीज होईल? : मिर्झापूरचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचे खूप भरभरून प्रेम दिले होते. त्यानंतर त्याचा दुसरा सीझन 2020 मध्ये आला. आता 4 वर्षांनंतर चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. निर्मात्यांनी या वेब सीरीजचं पोस्टर रिलीज केलं आहे, परंतु अद्याप त्याच्या प्रदर्शनाची कोणतीही तारीख समोर आलेली नाही. मात्र तिसरा सीझन हा 2024मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'मिर्झापूर' सीझन 3 अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होणार आहे. या सीरीजची कहाणी सत्ता संघर्ष, सूड आणि कौटुंबिक विषयावर असणार आहे.

हेही वाचा :

  1. मराठी कलावंतांचा गुढीपाडवा 'चिरायू'; 17 वर्षांपासून सुरू आहे उपक्रम - GUDIPADwA 2024
  2. प्लॅस्टिक सर्जरीनं मंदिरा बेदींच्या चेहऱ्यात मोठा बदल; चाहत्यांना बसला धक्का - Mandira Bedi New Look
  3. 'जम्पिंग जॅक' जितेंद्रचा वाढदिवस: जाणून घ्या जितेंद्रच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल 'या' विशेष गोष्टी - happy birthday jeetendra

ABOUT THE AUTHOR

...view details