महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हृतिक रोशनचा डान्स बघून मनोज वाजपेयीच्या नृत्य करण्याच्या स्वप्नाचा झाला चुराडा - MANOJ BAJPAYEE - MANOJ BAJPAYEE

MANOJ BAJPAYEE DANCING DREAMS : मनोज बाजपेयीआज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानंही इतर अभिनेत्यांप्रमाणे पडद्यावर नृत्य कौशल्य दाखवण्याचं स्वप्न बाळगलं होतं. परंतु जेव्हा त्यानं हृतिक रोशनला पडद्यावर नृत्य करताना पाहिलं तेव्हा आपलं स्वप्न पाहणं कायमचं बंद करुन टाकलं.

MANOJ BAJPAYEE DANCING DREAMS
मनोज वाजपेयी

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 1:07 PM IST

मुंबई- MANOJ BAJPAYEE DANCING DREAMS : हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता मनोज बाजपेयी 23 एप्रिल रोजी 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या तीन दशकांमध्ये त्यानं आपल्या प्रतिभेनं प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. गंभीर, विनोदी, संवेदनशील, नाट्यमय भूमिकांसह त्यानं खलनायकी भूमिकाही साकारत एक चतुरस्त्र अभिनेता असल्याचं सिद्ध केलंय. अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी त्यानं दिल्ली गाठली, पण त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अनेक प्रयत्नानंतरही प्रवेश मिळू शकला नाही. पण तो अभिनय करायचा थांबला नाही. रंगमंचाला जवळ करत त्यानं आपली तपस्या सुरू ठेवली आणि अनेक अडथळ्यांचा सामना करत आपलं ध्येय गाठलं. आज तो हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीच्या नयकांपैकी एक आहे.

हिंदी सिनेमाचं खास वैशिष्य समजलं जात ते चित्रपटात असलेली गाणी. पडद्यावर भूमिका साकारताना नृत्याची जोड असेल तर ते नायकाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतं. मनोजनंही पडद्यावर अनेक गाणी साकारली आहेत. यासाठी त्याला नृत्यातही पारंगत व्हायचं होतं. परंतु तो पुढच्याकाळात कधीच नृत्यात निपुण होऊ शकला नाही.

पडद्यावर आपले नृत्य कौशल्य दाखवण्याच्या त्याच्या सुरुवातीच्या आकांक्षा त्यानं स्पष्टपणे शेअर केल्या आहेत. हृतिक रोशनला नाचताना पाहून मनोज बाजपेयीनं त्याचं नृत्याचं स्वप्न पूर्ण केलं. मनोज बाजपेयी यानं 'छाऊ' या सेमी-क्लासिकल नृत्य प्रकारात प्रशिक्षित होता. त्यानं एकेकाळी पडद्यावर आपले नृत्य कौशल्य दाखवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आपल्या अभिनय प्रवासावर भाष्य करताना मनोज बायजपेयीनं एका शोमध्ये त्याच्या नृत्याच्या आवडीबद्दल आणि छाऊ या नृत्याचे प्रसिक्षण घेतल्याबद्दलचा खुलासा केला होता. मात्र, हृतिक रोशन जेव्हा पडद्यावर नृत्य करताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याला स्वतःचं नृत्य कौशल्य आणि हृतिकचं नृत्यातील प्रभूत्व याच्यात असलेलं अंतर जाणवलं आणि त्यानं पडद्यावर नृत्य करण्याची आपली महत्त्वाकांक्षा सोडून दिली.

मनोजनं आपल्या डान्सला राम राम टोकण्याचं कारण सांगताना एका मुलाखतीत सांगितलं होतं, "मैं छाऊ डान्स में ट्रेन्ड हूँ, पर फिर जब मैने हृतिक को देखा तो मैने सोचा आज से डान्सींग का ख्वाब बंद. अब ये नहीं सीख सकता मैं."

मनोज बाजपेयीच्या अभिनयचा प्रवास शेखर कपूरच्या 'बँडिट क्वीन'पासून सुरू झाला आणि पुढे 'सत्या', 'शूल', 'कौन' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या चित्रपटांमध्ये नजरेत भरतील अशा भूमिकांनी त्याची भरभराट झाली. राम गोपाल वर्माच्या 'सत्या' मधील गँगस्टर भिकू म्हात्रेच्या भूमिकेनं त्याला रातोरात स्टारडम मिळवून दिला आणि जबरदस्त प्रतिसादानं त्याच्या अभिनय प्रतिभेवर शिक्कामोर्तब झाला.

अभिनयासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि समीक्षकांची प्रशंसा मनोज बायपेयी स्वतःला अजूनही विद्यार्थी समजतो. रोज आपल्या अभिनयात काय करता येईल याचा विचार करत असतो. त्यानं अपार समर्पण आणि त्याग करून यशाचा मार्ग मोकळा केला आहे आणि आव्हानांवर मात केली आहे.

मनोज बाजपेयी नुकतेच 'सायलेन्स 2: द नाईट आऊल बार शूटआउट'मध्ये दिसला होता. हा चित्रपट 'सायलेन्स'चा सीक्वल आहे. या आबान भरुचा देवहंस दिग्दर्शित आकर्षक थ्रिलर चित्रपटामध्ये मनोज बाजपेयींनं एसीपी अविनाशच्या भूमिका पुन्हा एकदा साकारली होती.

हेही वाचा -

  1. श्रद्धा कपूरनं ज्वेलरी शॉपमध्ये सेल्सवुमन म्हणून केलं काम, व्हिडिओ व्हायरल - Shraddha Kapoor
  2. सलमान खान वाय प्लस सिक्युरिटीमध्ये करणार 'सिकंदर'ची शूटिंग - salman khan y plus security team
  3. दिशा पटानीचा बॅकफ्लिप स्टंट पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या -पाहा व्हिडिओ - Disha Patani

ABOUT THE AUTHOR

...view details