महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ममता कुलकर्णी यांची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी, जाणून घ्या कारण... - MAMTA KULKARNI EXPELLED

किन्नर आखाड्यानं ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून काढून टाकलं आहे. त्यांना हे पद देण्याबाबत आता अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Mamta kulkarni
ममता कुलकर्णी (ममता कुलकर्णी (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 31, 2025, 5:03 PM IST

मुंबई :प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान, किन्नर आखाड्यानं मोठी कारवाई करत नुकतीच महामंडलेश्वर झालेल्या ममता कुलकर्णी यांना या पदावरून काढून टाकलं आहे. याशिवाय त्याच्याबरोबर, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर आणि आखाड्याच्या पदावरून काढून टाकलं आहे. तसेच किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी पुन्हा एकदा आखाड्याची नवीन पद्धतीनं रचना केली आहे. ममता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळाव्यात संन्यास घेतला होता.

नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप:किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी आता कडक कारवाई केली आहे. त्यांनी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी, अजय दास यांनी आखाड्या संबंधित काही योजना जाहीर केल्या आहेत. लवकरच नवीन आचार्य महामंडलेश्वर यांची नियुक्ती केली जाईल, असं सध्या सांगितलं जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ममता कुलकर्णीनं प्रयागराजमधील संगम घाटावर पिंडदान केलं होतं. यानंतर काही काळानंतर, लक्ष्मी नारायण यांनी घोषणा केली होती की, ममता कुलकर्णी यांची महामंडलेश्वर पदावर नियुक्त करण्यात आली आहे. हा निर्णय अनेकांना आवडला नव्हता. बाबा रामदेव यांच्यासह काही व्यक्तींनी ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यावर प्रश्न देखील उपस्थित केले होते.

ममता कुलकर्णी यांच्यावर प्रश्नचिन्ह केले गेले उपस्थित : महाकुंभ मेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर ममता कुलकर्णीच्या नियुक्तीवर ट्रान्सजेंडर कथावाचक जगतगुरु हिमांगी सखी माँ यांनी देखील शंका व्यक्त केली होती. हिमांशी सखीनं कुलकर्णी यांच्या भूतकाळातील वादांकडे पाहात, या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याशिवाय 'किन्नर आखाड्यानं प्रसिद्धीसाठी ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनवले आहे. त्यांच्या भूतकाळाबद्दल सर्वांना माहिती आहे, त्या यापूर्वीही ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेल्या आहे. अचानक त्या भारतात येतात, महाकुंभात भाग घेतात आणि त्यांना महामंडलेश्वराचे स्थान दिले जाते. याची चौकशी झाली केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं.

'या' 5 गोष्टींमुळे महामंडलेश्वरचे पद हिसकावून घेतलं गेलं.

1. संन्यासी होण्यापूर्वीच महामंडलेश्वर ही पदवी दिल्यामुळे वाद निर्माण झाला.

2. 90च्या दशकात चित्रपटांमध्ये ती खूप बोल्ड असायची यावर लोकांनी आक्षेप घेतला.

3. ममता कुलकर्णी यांचं नाव अंडरवर्ल्डशी जोडल्याचा आरोप आहे.

4. मुंडन संस्काराशिवाय महामंडलेश्वर बनल्या

5. किन्नर आखाड्याच्या नियमांनुसार वैजंतीची माळ न घालणे.

हेही वाचा :

  1. कुंभमेळ्यात ममता कुलकर्णी बनली 'माई ममता नंद गिरी', संगमात स्वतःचं केलं 'पिंड दान'
  2. ममता कुलकर्णीनं 24 वर्षांनंतर केला ड्रग केसबद्दल खुलासा, काय आहे सत्य जाणून घ्या...

ABOUT THE AUTHOR

...view details