महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सोन्यासारख्या दोन मुली असताना केली आत्महत्या, मलायका आणि अमृताचे वडील अनिल मेहता यांनी जीवन संपवलं - ANIL ARORA - ANIL ARORA

Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. तिचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Malaika Arora Father Death
मलायका अरोराच्या वडिलांचं निधन (Photo - IANS)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 11, 2024, 12:54 PM IST

Updated : Sep 12, 2024, 9:19 AM IST

मुंबई Malaika Arora Father Death : मनोरंजन विश्वातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांचे 11 सप्टेंबर रोजी निधन झालंय. अनिल मेहता यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबईतील वांद्रे पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. वडिलांच्या निधनामुळं अभिनेत्री मलायका अरोरासह तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाच्या वडिलांनी टोकाचं पाऊल का उचलले असावं? हे सध्या समोर आलेलं नाही. मलाइका अरोराच्या वडिलांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूड स्टार्स आता सोशल मीडियाच्या माध्यामातून शोक व्यक्त करत आहे.

मलायकाच्या वडिलांनी केली आत्महत्या :दरम्यान वांद्रे पश्चिम येथे असलेल्या आयलमेडा पार्क या अपार्टमेंटमध्ये मलायकाचे वडील राहत होते. या घटनेची माहिती मिळताच मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान हा घटनास्थळी पोहोचला आहे. याशिवाय या कठिण प्रसंगात सलमान खानचं कुटुंब देखील घटनास्थळी स्पॉट झालं. ही घटना घडली तेव्हा मलायका पुण्यात होती. 10 सप्टेंबर रोजी मलायका आणि अमृता दोघीही आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी गेल्या होत्या. आज ही घटना घडल्यानंतर सगळेच हादरले आहेत.

मलायका अरोराच्या वडिलांचं निधन (ETV bharat Reporter)

अनिलमेहताबद्दल : 50 वर्षीय मलायका अरोराची आई जॉयस पॉलीकार्प या मल्याळी ख्रिश्चन आहे. तिचे वडील अनिल मेहता फाजिल्का शहरातील पंजाबी हिंदू होते, त्यांनी भारतीय मर्चंट नेव्हीसाठी काम केलं होतं. दरम्यान मलायकानं आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. जेव्हा मलायका 11 वर्षांची होती, तेव्हा तिनं आपल्या आई-वडिलांना वेगळ होताना पाहिलं होतं.

मलाइकाचाही झालाघटस्फोट:अनिल आणि जॉयस पॉलीकार्प यांची मुलगी मलायकानं 1998मध्ये अरबाज खानशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगा आहे, त्याचं नाव अरहान आहे. तिनं अरबाजबरोबर 2017मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करत होती, मात्र आता ब्रेकअपची चर्चा आहेत. दुसरीकडे, अनिल आणि जॉयसची दुसरी मुलगी अमृतानं 2009 मध्ये शकील लडकशी लग्न केलं. तिला दोन मुले आहेत.

हेही वाचा :

  1. ब्रेकअपच्या चर्चेमध्ये गर्दीत मलायका अरोरानं केलं अर्जुन कपूरकडे दुर्लक्ष - MALAIKA and ARJUNs video viral
  2. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर याचं काय चाललंय? ब्रेकअपची चर्चा असतानाच दोघंही मुंबई विमानतळावर झाले स्पॉट... - Malaika Arora and Arjun Kapoor
  3. बीच व्हॅकेशनमध्ये मिस्ट्री मॅनबरोबर दिसली मलायका अरोरा, फोटो व्हायरल - malaika arora
Last Updated : Sep 12, 2024, 9:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details