मुंबई - Malaika Arora and Arjun Kapoor: अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे खूप चर्चेत आहेत. हे दोघेही विमानतळावर स्पॉट झाले होते. अर्जुन आणि मलायका एका फॅशन इव्हेंटसाठी गेले आहेत. आता या कार्यक्रमातील अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. हे व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर, असं म्हणता येईल की, या जोडप्यात काहीतरी गडबड सुरू आहे. अर्जुन आणि मलायका दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाले असताना दोघेही एकमेंकापासून दूर बसले होते. या कार्यक्रमात दोघांनी एकमेंकाबरोबर बोलायचं देखील टाळलं होतं.
मलायकानं केलं अर्जुनकडे दुर्लक्ष : दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओत मलायकानं अर्जुनकडे दुर्लक्ष केल्याचं दिसलं. या व्हिडिओमध्ये अर्जुनला त्याच्या चाहत्यांनी घेरलं होतं आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेत होते. यानंतर मलायका तिथून जाते आणि अर्जुन तिचा रस्ता सोडून तिच्या पाठेवरुन हात ठेवून तिला प्रोटेक्ट करताना दिसतो. मलायकानं यावेळी अर्जुनकडे पाहिलं देखील नाही आणि ती सरळ तिथून खूप वेगानं निघून गेली. व्हायरल व्हिडिओमध्ये अर्जुननं मलायकाला प्रोटेक्ट केल्याचं नेटकऱ्यांच्या चांगलंच मनाला भावलं आहे. आता या व्हिडिओ अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं म्हटलं, "अर्जुन हा खरोखरचं खूप चांगला व्यक्ती आहे." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "अर्जुन हा अंबानीच्या लग्नात देखील एकटा गेला होता, यावेळी त्याच्याबरोबर मलायका नव्हती." या व्हिडिओवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून अर्जुनवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.