मुंबई Mahesh manjrekar :मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आता चर्चेत आले आहेत. त्यांनी 28 मार्च रोजी मुंबईमधील दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती ही आज देशभरात साजरी केली जात आहे. दरम्यान या विशेष दिवशी महेश मांजरेकरांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल घोषणा केली आहे. मांजरेकर हे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट निर्मित करणार असल्याचं समजत आहे.
महेश मांजरेकर करणार राजकीय चित्रपटाती निर्मिती :मीडियाबरोबर बोलताना त्यांनी म्हटलं, "सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मी नक्की एखादा चित्रपट काढेन." महेश मांजरेकरांना यावेळी राजकीय प्रश्न विचारण्यात आले. यानंतर त्यांनी म्हटलं, "मी राजकारणासाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमामध्ये आलो आहे." शिवाजी महाराज पार्कवर हा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीयेला झाला होता. तारखेनुसार शिवजयंती 19 फेब्रुवारीला आणि तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला अशा दोन शिवजयंती साजरी करतात. यावर्षी तिथीनुसार शिवजयंती 28 मार्चला आली आहे.