महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'केजीएफ' स्टार यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाची लेटेस्ट अपडेट, हॉलिवूड स्टार करणार 'रॉकी भाई'बरोबर अ‍ॅक्शन - KGF star Yash Toxic movie - KGF STAR YASH TOXIC MOVIE

KGF star Yash Toxic movie : भारतीय चित्रपटसृष्टीचा आगामी बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक' चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाबद्दलची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. आता या चित्रपटात हॉलिवूडचा अभिनेताही दिसणार असल्याची चर्चा आहे.

Benedict Garrett's entry in 'Toxic'
बेनेडिक्ट गॅरेटची 'टॉक्सिक'मध्ये एंट्री (( Instagram / ETV Bharat))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 7:45 PM IST

मुंबई - 'केजीएफ' चित्रपटाचा रॉकिंग स्टार यश आणि मल्याळम दिग्दर्शक गीतू मोहनदास 'टॉक्सिक' हा एक जबरदस्त अ‍ॅक्शन असलेला पॅन वर्ल्ड फिल्म घेऊन येत आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्यामुळे यशचे चाहते चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचा मोशन पिक्चर रिलीज केलं होतं. ते पाहून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता ताणली होती. चित्रपटाचं शूटिंग जोरात सुरू आहे आणि निर्माते देखील नवीन अपडेट्ससह चाहत्यांचा उत्साह कायम ठेवण्यात यशस्वी होत आहेत. अलीकडेच चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे की एका हॉलीवूड स्टारनं 'टॉक्सिक'मध्ये प्रवेश केला आहे. तो कोण आहे याबद्दलही प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट गॅरेटची 'टॉक्सिक'मध्ये एंट्री

सध्या हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट गॅरेटची 'टॉक्सिक' चित्रपटामध्ये एन्ट्री झाली आहे. तर तेलुगू आणि तमिळमधील प्रसिद्ध सहाय्यक अभिनेता तनिकेला भरणीही 'टॉक्सिक' चित्रपटात काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी तनिकेला भरणी यांनी आपल्या भागाच्या शूटिंगमध्ये सहभाग घेतला होता. ब्रिटीश अभिनेता बेनेडिक्ट गॅरेट सध्या मुंबईमध्ये राहतो आहे आणि त्यानं हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये 'कहाँ दम था', 'कॉन्ज्युरिंग कन्नप्पन' यासह इतर चित्रपटांचा समावेश आहे. त्याची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. एका नेटिझनने त्या पोस्टवर कमेंट केली की 'KGF 3' अपूर्ण आहे. याच्या उत्तरात बेनेडिक्ट गॅरेटने लिहिले की, मी आता यशबरोबर काम करणार आहे. यामुळे तो यशच्या 'टॉक्सिक'मध्ये दिसणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

आताही यशच्या नव्या हेअरस्टाइल आणि स्टारकास्टची चर्चा होत आहे. बेंगळुरूमधील एचएमटी फॅक्टरीजवळ २० एकर परिसरात बांधलेल्या सेटवर मोठ्या पातळीवर या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. नयनतारा, कियारा अडवाणी आणि हुमा कुरेशी या चित्रपटात दिसणार असल्याचीही चर्चा आहे. यशच्या एका जवळच्या मित्रानं दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही अभिनेत्रींनी काही दिवसांपूर्वीच यशबरोबर काम केलं आहे.

यशचा 'टॉक्सिक' आहे 'पॅन वर्ल्ड' चित्रपट

'टॉक्सिक' हा चित्रपट एक गँगस्टरची कथा असून या चित्रपटात यश दोन शेडमध्ये दिसणार आहे. 'केजीएफ' पॅन इंडियासाठी बनवण्यात आले होते. त्यामुळे या चित्रपटात सर्व भाषांमधील अभिनेता आणि अभिनेत्रींना स्थान देण्यात आले आहे. नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट गॅरेट, तेलुगू अभिनेता तनिकेला भरणी आणि इतर अनेकांनी यशबरोबर या चित्रपटात काम केलं आहे. पण अद्याप यश आणि क्रू व्यतिरिक्त काहीही अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details