मुंबई -मराठी सिनेसृष्टीनं अनेक सुंदर चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित केले आहेत. आजकाल मराठी चित्रपट पाहायला अनेकजण चित्रपटगृहांमध्ये जातात. मात्र आधी 90च्या दशकात मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना खूप वाट पाहवी लागत होती. तसेच मराठी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर पहिलं नाव प्रत्येकांना लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डेचं आठवते. आज लक्ष्या या जगात नाही आहे, मात्र तो आता देखील त्याच्या चित्रपटाद्वारे आपल्यात आहे. आम्ही तुम्हाला लक्ष्याच्या अशा काही पाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तो प्रत्येकांचा लाडका कलाकार बनला .
1 झपाटलेला : महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे स्टारर 'झपाटलेला'ला हा 1993मधील हिट चित्रपट होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश कोठारेनं केलं होतं. हा चित्रपट हॉलिवुडच्या 'चाईल्डस प्ले ' या चित्रपटावरून प्रेरित आहे. या चित्रपटामध्ये एका सिरियल किलरची आत्मा एका बहुल्यात अडकलेली असते. तो त्या व्यक्तीच्या मागे असतो, ज्याला तो सर्वात प्रथम सांगतो की, तो बाहुला नाही, एक गुंड आहे. आता या सिरियल किलरच्या आत्माला त्या व्यक्तीचं शरीर पाहिजे असते. दरम्यान महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे चित्रपटामध्ये या सिरियल किलरच्या रहस्यावरून पडदा उचलतात. 'झपाटलेला' चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आहे.
2 दे दणा दण :1987चा 'दे दणा दण' चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात लक्ष्या एका विस्फोटातून वाचल्यानंतर त्याला अद्भुत शक्ती मिळते, तो अतिवेगानं धाऊ शकतो, तो लोकांना सहज ढेर करू शकतो, मात्र त्याच्या समोर लाल रंग आला तर, त्याच्या सर्व शक्ती नाहीशी होत असतात. तो आपल्या शक्तीन बजारंगाच नाव घेऊन वाईट लोकांशी लढत असतो. लक्ष्याचा हा चित्रपट खूप गंमतीशीर आहे.
3 बाळाचे बाप ब्रह्मचारी :गिरीश घाणेकर दिग्दर्शित 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' चित्रपट 1989मध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, अलका कुबल, सिद्धार्थ राय, सुधीर जोशी या कलाकरांनी खूप सुंदर अभिनय केला आहे. या चित्रपटात असं दाखविण्यात आलं आहे की, दोन अविवाहितांचे आयुष्य बदलून जाते, जेव्हा त्यांना त्यांच्या घराबाहेर एक बाळ सापडते. यानंतर हे दोघेही त्या छोट्या बाळाची काळजी घेतात. अनुभव नसल्यानं, त्यांना या बाळाचे संगोपन करण्यात खूप अडचणी येतात.
लक्ष्मीकांत बेर्डे (Photo - movie posters) 4 धडकेबाज : या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेला एक छोटी बाटली सापडते, ज्यामध्ये त्याचा सारखा दिसणारा एक गंगाराम अडकलेला असतो. त्याला सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये तो अनेक समस्यांमधून जात असतो. या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे व्यतिरिक्त महेश कोठारी, रवींद्र बेर्डे प्राजक्ता दिघे आणि दीपक शिर्के यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट 1990मध्ये प्रदर्शित झाला होता.
5 अशी ही बनवा बनवी : हा 1988चा मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन पिळगावकरनं केलं आहे. 'अशी ही बनवा बनवी' चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, सिद्धार्थ राय, अश्विनी भावे, विजय खोटे, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, नयनतारा हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाची कहाणी दोन भावांची आहे, ज्यांना त्यांच्या दोन मित्रांना पत्नी म्हणून दाखवण्यासाठी भाग पाडते, कारण त्यांची घरमालक फक्त विवाहित जोडप्यांना भाडेकरू म्हणून ठेवणार असते आणि त्यांना ते घर आवडलं असते. यानंतर जेव्हा हे दोन भाऊ आपल्या खोट्या पत्नीसह या घरात राहण्यासाठी येतात, त्यानंतर गोंधळ सुरू होतो.