मुंबई - Kushiyaan Bator lo Song : हिंदी चित्रपटसृष्टीचा 'सिंघम' अजय देवगण, साऊथ अभिनेत्री ज्योतिका आणि आर. माधवन स्टारर हॉरर थ्रिलर-सस्पेन्स चित्रपट 'शैतान'मधील पहिलं गाणं 'खुशियां बटोर लो' आज 15 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात आलं आहे. निर्मात्यांनी अलीकडेच 'खुशियां बटोर लो' या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज केला होता, मात्र या गाण्याची रिलीज तारीख जाहीर केली गेली नव्हती. 'खुशियां बटोर लो' हे गाणं जुबिन नौटियाल यांनी गायलं असून त्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत. याशिवाय या गाण्याला अमित त्रिवेदी यांनी संगीत दिलंय. 'खुशियां बटोर लो' गाण्याचे पोस्टर देखील समोर आलं आहे, ज्यामध्ये अजय देवगण आणि ज्योतिका त्यांच्या मुलांसोबत दिसत आहेत.
'शैतान' चित्रपाटत आर. माधवनची महत्त्वाची भूमिका : काही दिवसापूर्वी 'शैतान' चित्रपटाचा 1.31 मिनिटांचा टीझर रिलीज करण्यात आला होता, जो खूप थरारक होता. टीझरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आर. माधवन भीतीबद्दल सांगत होता. अजय देवगण फिल्म्स आणि पॅनोरमाच्या बॅनरखाली निर्मित 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केलंय. अलीकडेच या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर एक पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, ज्यावरून हा चित्रपट थ्रिलर, सस्पेन्स आणि काळ्या जादूटोणा आधारित असल्याचं दिसत होतं. या चित्रपटाची वाट अनेकजण पाहत आहेत. ज्योतिका बऱ्याच दिवसानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे.