मुंबई: अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. बऱ्याच काळापासून तिच्या बिझनेसमॅन कबीर बहियासोबतच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. मात्र या दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही. अनेकदा हे दोघेही एकत्र दिसले आहेत. कौटुंबिक कार्यक्रमापासून ते पार्ट्यांपर्यंत, दोघेही एकत्र एन्जॉय करताना दिसतात. आता दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. एका न्यूज पोर्टलनुसार दोघेही त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. क्रिती आणि कबीर हे अलीकडेच एकत्र विमानतळावर स्पॉट झाले होते. विमातळावर क्रितीनं मास्क घातलं होता. तसेच तिनं काळ्या रंगाचा चष्मा आणि टोपी घातली होती. डेनिम जीन्स आणि काळ्या जॅकेटमध्ये क्रिती खूप सुंदर दिसत होती.
क्रिती सेनॉन करणार लग्न ? : तसेच कबीर बहियानं देखील काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. आता हे दोघेही 2025च्या अखेरीस लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच क्रिती आणि कबीर बेंगळुरूमध्ये एका लग्नात एकत्र दिसले होते. दोघांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही लग्नाचा आनंद घेताना दिसत होते. कबीर हा लंडनमधील एक व्यावसायिक असल्याचं सांगण्यात येत आहे. आता क्रिती सेनॉन आपल्या चाहत्यांना लवकरच आनंदाची बातमी देऊ शकते, असं सध्या दिसत आहे.