मुंबई - Akshay Kumar:'सरफिरा'नंतर अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट 'खेल खेल में'च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. खिलाडी कुमारचा हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत होता. आता त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. आज 25 जुलै रोजी निर्मात्यांनी चित्रपटामधील 'हौली हौली' गाणं रिलीज केलं आहे. हे गाणं खूप दमदार आहे. या गाण्यामध्ये पंजाबी तडका पाहायला मिळत आहे. हे गाणं गुरु रंधावा, यो यो हनी सिंग, नेहा कक्कर यांनी गायलं आहे. तसेच या गाण्याला संगीत तनिष्क बागची, मुहम्मद साजिद, रोचक कोहली, गुरु रंधावा, तीव्र, जस्सी सिद्धूनं दिलंय. या गाण्याची निर्मिती गुलशन कुमार, टी-सीरीज आणि वाकाओ फिल्म्सनं केली आहे.
अक्षय कुमार स्टारर 'खेल खेल में' चित्रपटातील 'हौली हौली' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - Khel Khel Mein first song - KHEL KHEL MEIN FIRST SONG
Akshay Kumar: अक्षय कुमार आणि वाणी कपूर अभिनीत 'खेल खेल में' चित्रपटातील 'हौली हौली' गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात अक्षयचा दमदार परफॉर्मेंस पाहायला मिळत आहे.
Published : Jul 25, 2024, 6:41 PM IST
'खेल खेल में'मधील पहिलं गाणं प्रदर्शित :'हौली हौली' गाण्याची कोरिओग्राफी पियुष भगत आणि शाझिया सामजी यांनी केली आहे. यापूर्वी, अक्षयनं गाण्याच्या शूटिंगची एक झलक त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केली होती. 'खेल खेल में' या चित्रपटामध्ये कॉमेडी आणि रोमांन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता अक्षयला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. दरम्यान अक्षयन शेअर केलेला हा शूटिंगचा व्हिडिओ खूप मनोरंजक आहे. अक्षय कुमार त्याच्या अभिनयाबरोबर त्याच्या खोड्यांसाठी देखील ओळखला जातो. व्हिडिओत अक्षय हा वाणी कपूर, तापसी पन्नू आणि इतर कलाकारांबरोबर दिसत आहेत. प्रत्येकजण गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. दरम्यान, अक्षय अचानक जमिनीवर झोपतो आणि नागिन डान्स करतो. त्यांची मजा बघून सगळेच हसतात.
'खेल खेल में' चित्रपटाबद्दल : आता 'हौली हौली' या सूटचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहून चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "मेहनत, स्मित...आणि संपूर्ण युनिटचे प्रेम. मी हे सर्व गोळा करून तुमच्या हाती देत आहे. ट्रेलरच्या आधी गाणे प्ले करा." त्यानं हे गाणं रिलीज होण्यापूर्वी गाण्याची छोटीशी झलक दाखवून चाहत्यांना खुश केलं होतं. 'खेल खेल में' या चित्रपटाचं दिग्दर्शन मुदस्सर अझीझ यांनी केलंय. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, शशिकांत सिन्हा आणि अजय राय यांनी केली आहेत. 'खेल खेलमें'मध्ये अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू व्यतिरिक्त पंजाबी अभिनेता एमी विर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.