महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कतरिना कैफ आणि शर्वरी वाघनं सनी कौशल आणि तापसी पन्नू स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा'च्या टीमचं केलं कौतुक - Katrina Kaif reaction - KATRINA KAIF REACTION

Phir Aayi Haseen Dillruba: कतरिना कैफनं पती विकी कौशलबरोबर नुकताच प्रदर्शित झालेला सनी कौशलचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपट पाहायला आहे. याशिवाय सनीची कथित गर्लफ्रेंड शर्वरी वाघनं देखील या चित्रपटाचा आनंद घेतला आहे. आता सोशल मीडियावर कतरिना आणि शर्वरीनं 'फिर आयी हसीन दिलरुबा'च्या टीमचं कौतुक केलंय.

Phir Aayi Haseen Dillruba
फिर आयी हसीन दिलरुबा ((ANI/ Film Poster(Taapsee Pannu))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 2:01 PM IST

मुंबई - Phir Aayi Haseen Dillruba: अभिनेत्री तापसी पन्नू, सनी कौशल आणि विक्रांत मॅसी स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपट नेटफ्लिक्सवर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान सनीचीच्या वहिनीनं म्हणजेच कतरिना कैफनं आता या चित्रपटाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पती विकी कौशलबरोबर चित्रपट पाहिल्यानंतर, तिनं सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आणि सनीला तिचा सर्वोत्कृष्ट दिर असल्याचं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली. याबरोबरच सनीची कथित गर्लफ्रेंड शर्वरी वाघनं सनीच्या या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

फिर आयी हसीन दिलरुबा (कतरिना कैफ - instagram)

कतरिनानंपाहायला 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपट : आज 11 ऑगस्ट रोजी कतरिना कैफनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा एक सीन पोस्ट करत लिहिलं, "फिर आयी हसीन दिलरुबा, नेटफ्लिक्सवर पाहिला, खूप एन्जॉय केला, मला काही गोष्टी पतीला समजावून सांगण्यासाठी अनेक वेळा अर्ध्यात थांबवावे लागले. आनंद एल राय, विक्रांत मॅसी, तापसी पन्नू, जिमी शेरगिल यांचे अभिनंदन. सनी कौशल, तू मला आश्चर्यचकित केलेस, मला खात्री आहे की तू जे काही बोलतो ते नेहमी खरे असते. सर्वोत्कृष्ट दिर, मी तुम्हाला यापुढे कधीही त्रास देणार नाही." या चित्रपटामध्ये सनी कौशल आणि विक्रांत मॅसीचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

फिर आयी हसीन दिलरुबा (कतरिना कैफ - instagram)

शर्वरी वाघनं दिल प्रतिक्रिया :सनी कौशलची कथित गर्लफ्रेंड शर्वरी वाघनं चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत लिहिलं, "किती छान वेळ आहे, मी माझ्या सोफ्यावर बसून चित्रपट पाहिला, सनी कौशलचा उत्कृष्ट अभिनय, तापसी, विक्रांत मॅसी तुम्ही सर्वांनी या चित्रपटाला हिट केलं. संपूर्ण टीमचं अभिनंदन." या चित्रपटाची कहाणी कनिका ढिल्लन यांनी लिहिली आहे. जयप्रद देसाई यांनी 'फिर आयी हसीन दिलरुबा'चं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाचा पहिला भाग 'हसीना दिलरुबा' हा 2021मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता.

हेही वाचा :

  1. 'फिर आयी हसीन दिलरुबा'च्या रिलीजपूर्वी तापसी पन्नूनं दिली 'हसीन दिलरुबा 3'ची हिंट - Haseen Dillruba
  2. इंजिनीअरिंग सुरू असताना मॉडेलिंग करण्याचा केला निर्णय, आता बनली बॉलिवूडची 'हसीन दिलरुबा' - taapsee pannu
  3. ही दिलरुबा 'हसीन'च नाही तर 'शातिर'ही आहे....!!

ABOUT THE AUTHOR

...view details