मुंबई Kartik Tripti on Namo Bharat : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच, त्यानं अभिनेत्री तृप्ती डिमरीबरोबर एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्यानं सांगितलं आहे की, तो राष्ट्राचा संस्कृती गौरव 'नमो भारत'साठी रॅम्पवर चालणार आहे. सोमवारी, 30 सप्टेंबर रोजी कार्तिकनं 'नमो भारत' कार्यक्रमासाठी तृप्तीबरोबर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'नमो भारत'साठी रॅम्पवर चालणं हा एक सन्मान असून मजबूत मानवी आत्मा, धैर्य आणि आपल्या राष्ट्राची व्याख्या करणाऱ्या संस्कृतीचा गौरव आहे. आपल्या खऱ्या जीवनातील सन्मान करणाऱ्या आणि भारताला खरोखरच उत्तम बनवणाऱ्या शक्ती उत्सवाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटत आहे.'
'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालनचा नवा अवतार :काही दिवसांपूर्वी 'भूल भुलैया 3'च्या निर्मात्यानं चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. या टीझरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. 'भूल भुलैया 3' चित्रपटात विद्या बालन मंजुलिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. तिला या रुपामध्ये पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या टीझरमध्ये तृप्ती डिमरी, कार्तिक आणि विद्या यांच्यासह इतर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची झलकही दाखवण्यात आली आहे. हा टीझर अनेकांना आवडला होता. 'भूल भुलैया 3' चित्रपट रुपेरी पडद्यावर दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.