मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन गुजरातमध्ये पार पडलेल्या 2024 फिल्मफेअर अवॉर्ड्सला हजर राहण्यासाठी जेव्हा कार्यक्रमस्थळी पोहोचला तेव्हा तारे तारकांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्तिकला पाहून त्याचे फॅन्स मोठ्याने गर्जना करुन लागले, तोही त्यांना प्रतिसाद देत हात दाखवत होता. बॅरिकेडच्या पलिकडे उभे असलेल्या चाहत्यांना हॅलो करण्यासाठी तो जेव्हा त्यांच्या जवळ गेला तेव्हा गर्दीचा रेटा वाढला आणि बॅरेकेडवरील ताण वाढल्यानं ते तुटले. यामुळे गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सुदैवानं या घटनेमध्ये चाहत्यांना मोठी दुखापत झाली नाही.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून गर्दीत सुव्यवस्था पूर्ववत केली. झाल्या प्रकारामुळे कार्तिकच्या चेहऱ्यावरही तणाव निर्माण झाला होता. अनपेक्षित परिस्थिती हाताळताना सुरक्षा रक्षकांनी त्याला गर्दीपासून सुखरुप नेव्हिगेट केले.
या घटनेनंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कार्तिकच्या सुरक्षेबद्दल भीती व्यक्त केली, तर काहींनी त्याच्या फॅन फॉलोइंगच्या या उत्स्फुर्त वागण्याचं कौतुक करत त्याचा सुपरस्टार म्हणून दर्जा उंचावल्याचे सांगितले. रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर आणि इतर सेलेब्रिटींनी हजेरी लावल्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये एक वेगळी चमक पाहायला मिळाली.
कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं तर तो कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचा नवीन लूक अलिकडेच लॉन्च करण्यात आला होता. 14 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडसह शीर्षक नसलेल्या चित्रपटात कार्तिक काम करणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यनचा अलिकडेच 33 वा वाढदिवस पार पडला. तेव्हा करण जोहर आणि एकताने त्याच्या या नव्या चित्रपटाची घोषणा करुन चाहत्यांना चकित केले होते. कारण कार्तिक आर्यनला 'दोस्ताना 2' चित्रपटातून बाहेर काढले, असा आरोप करण जोहरवर करण्यात आला होता. त्यामुळे कार्तिकच्या चाहत्यांनीही समाधान व्यक्त केले होते. याशिवाय, कार्तिक आर्यन हंसल मेहताच्या 'कॅप्टन इंडिया', अनुराग बसूच्या 'आशिकी 3' आणि हॉरर-कॉमेडी 'भूल भुलैय्या 3' मध्ये देखील दिसणार आहे.
हेही वाचा -
- फिल्मफेअर पुरस्कारामध्ये 'ॲनिमल' आणि 'ट्वेल्थ फेल'चा बोलबाला ; पाहा यादी
- 'बिग बॉस सीझन 17' चा विजेता ठरला मुनव्वर फारुकी! काय मिळालं बक्षीस?
- 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सॅम बहादूरनं केली कमालीची कामगिरी, विजेत्यांची यादी येथे पाहा