मुंबई - Saif ali khan family :अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यापैकी एक आहेत. दोघांची जोडी अनेकांना आवडते. करीना आणि सैफ दोघेही अनेकदा आपल्या कुटुंबासह एकत्र वेळ घालवताना दिसतात. हे जोडपे दोन मुलांचे पालक आहेत. करीना आणि सैफचे मुले तैमूर आणि जेह बऱ्याचदा त्याच्याबरोबर बाहेर जाताना दिसतात. हे दोघेही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहेत. दोघांच्या क्यूटनेस आणि खोडकर स्टाइलमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र असल्याचं दिसत आहे.
करीना कपूरच्या छोट्या मुलाला आला राग :या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधणारी व्यक्ती ही करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत करीना कपूर, सैफ अली खान आणि त्यांची दोन्ही मुले एकत्र घरातून बाहेर जाताना दिसत आहेत. सैफ पुढे जातो आणि त्याच्याशी बोलत असताना तैमूरही त्याच्या मागे येतो. यानंतर करीना कपूरबरोबर येत असताना जेहला अचानक राग येतो. रागात तो मागे वळून पाहात पापाराझींना म्हणतो, "असं करू नको ." यानंतर करीना त्याचा हात धरून त्याला पुढे घेऊन जाते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.