मुंबई- 12th Fail Team Legends : दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या '12th फेल' चित्रपटाचे समीक्षक, प्रेक्षकांसह असंख्य सेलेब्रिटींनी कौतुक केलं आहे. हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूरनेही अलकिडे हा चित्रपट पाहिल्यानंतर टीमचे कौतुक केले. या चित्रपटात विक्रांत मॅसी आणि मेधा शंकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर, करीनाचा चाहता असलेल्या विक्रांतने तिची स्टोरी पुन्हा पोस्ट केली आणि तिला अतिशय उत्सफूर्त प्रतिसाद दिला.
करीनाने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीजवर लिहिले, "12th फेल. विधू विनोद चोप्रा, विक्रांत मॅसी, मेधा शंकर, अनंत व्ही जोशी, अंशुमान पुष्कर आणि चित्रपटातील संपूर्ण कलाकार आणि क्रू लेजेंड्स आहेत." मॅसीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर करीनाला उत्तर देताना लिहिले, "बस, अब मैं रिटायर हो सकता हूं!! खूप खूप धन्यवाद, मॅडम! माझ्यासाठी याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहित नाही."
विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '१२th फेल' हा चित्रपट यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका अतिसामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या तरुणाची प्रेरणादायी कथा आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते याचं उत्कंठावर्धक वर्णन यात पाहायला मिळते. या चित्रपटात आयपीएस मनोज कुमार शर्मा आणि त्यांची आयआरएस अधिकारी पत्नी श्रद्धा जोशी यांची खरी कहाणी मांडण्यात आली आहे. यामध्ये मनोज शर्माची भूमिका विक्रांत मॅसीने केली आहे तर श्रद्धा जोशी यांच्या भूमिकेत मेधा शंकरने काम केले आहे. चंबळच्या खोऱ्यातील एक सामान्य मुलगा अपार मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कसा यूपीएससीची परीक्षा देतो आणि आयपीएस अधिकारी बनतो हे दाखवण्यात आलंय.