मुंबई- Karan Johars 52nd Birthday: बॉलिवूडचा लोकप्रिय आणि हिट चित्रपट निर्माता करण जोहर आज २५ मे रोजी आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. करण जोहरला बॉलिवूडचा किंगमेकर म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक स्टार किड्स लाँच केल्यामुळे त्याच्यावर घराणेशाहीचा सर्वात मोठा कलंक लागला आहे. करण जोहर आता दिग्दर्शक म्हणून कमी काम करत असला तरी निर्मितीच्या क्षेत्रात त्याची धडाडी वाखाणण्याजोगी आहे.
करण जोहरचा आतापर्यंतचा बॉलिवूडमधील प्रवास
करण जोहरनं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि 'कुछ-कुछ होता है' या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून पहिली निर्मिती केली. करण जोहरला या चित्रपटामुळे उत्तम मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या आधी, करणने शाहरुख खान आणि काजोल स्टारर 'दिलवाले दुल्हिया ले जायेंगे' या चित्रपटात सहाय्यक अभिनेता आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
करण जोहरचे टॉपचे चित्रपट
- कुछ-कुछ होता है (1998)
- कभी खुशी कभी गम (2001)
- कल हो ना हो (2003) निर्माता म्हणून
- माय नेम इज खान (२०१०)
- अग्निपथ (२०१२) निर्माता
- रॉकी आणि रानी की लव्ह स्टोरी (२०२३)
करण जोहरनं अभिनय केलेले चित्रपट
- दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1993)
- ओम शांती ओम (2007)
- लक बाय चान्स (2009)
- बॉम्बे वेल्वेट (२०१५)
करण जोहरचे आगामी प्रोजेक्ट्स
- मिस्टर आणि मिसेस माही (रिलीझ तारीख 31 मे 2024)
- ब्रह्मास्त्र भाग २ (रणबीर कपूर आलिया भट्ट)
- जिगरा (आलिया भट्ट आणि वेदांग रैना)
- सनी संस्कारीची तुलसी कुमारी (वरूण धवन आणि जान्हवी कपूर)
- किल (३१ मे २०२५)
- इंडियन 2 (निर्माता म्हणून)
- तख्त (दिग्दर्शक म्हणून)
- बॅड न्यूज (निर्माता म्हणून)
- देवरा भाग १ (निर्माता म्हणून)