मुंबई - Pushpa song : 'पुष्पा 2: द रुल' या बहुप्रतीक्षित चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' हे गाणं 1 मे रोजी रिलीज झाल्यानंतर इंटरनेटवर वादळ निर्माण झालं. हे गाणं, त्यातली अल्लु अर्जूनची स्टाईल आणि डान्स पाहून चाहत्यांना तर वेड लागणंच बाकी राहिलंय. गाण्यातील अल्लू अर्जुनच्या नृत्याने प्रभावित होऊन चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. त्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये 'पुष्पा 2' च्या गाण्याचं एक व्हिडिओ रील पोस्ट करत त्यावर लिहिले, "एक चक्रीवादळी रीलचा उद्रेक होणार."
गाण्याचे लॉन्चिंग झाल्यानंतर, अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर गाण्यात 'शू ड्रॉप स्टेप' करतानाची एक छोटी क्लिप शेअर केली. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, "पुष्पा पुष्पा गाण्याचे हे शू ड्रॉप स्टेप शेअर करताना आनंद झाला."
'पुष्पा 2' चे निर्मिती बॅनर मैत्री मुव्हीज मेकर्सने गाण्याच्या व्हिडिओसह एक्स सोशल मीडिया हँडलवर गाणं लॉन्च केलं आणि पोस्टला कॅप्शन दिलं, "पुष्पपुष्पा मंत्राने पुष्पा राजच्या आगमनाचा जयजयकार करा."
'पुष्पा पुष्पा' गाण्याच्या व्हिडिओमध्ये, पुष्पा राज उर्फ अल्लू अर्जुन एका हातात चहाचा ग्लास घेऊन स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे. क्लिपचा शेवट पुष्पाच्या प्रतिष्ठित डायलॉग 'झुकेगा नही साला' आपल्या दाढीवरुन उलटा हात फिरवत स्टाईलमध्ये म्हणताना दिसतो.
संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद ज्यांनी 'पुष्पा १: द राइज' या चित्रपटातील गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. त्यांनीच 'पुष्पा 2' साठी हा ट्रॅक पुन्हा तयार केला आहे. देवी श्री प्रसाद यांनी गाण्याच्या इतर भाषेतील गाण्यासाठी नकाश अझीझ, दीपक ब्लू, मिका सिंग, विजय प्रकाश, रंजित गोविंद आणि तिमिर बिस्वास या लोकप्रिय गायकांना सामील करून घेतले आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलीकडेच सुपरस्टार अल्लु अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा राज उर्फ अल्लू अर्जुनच्या टीझरचे लॉन्चिंग केले होते. आपला वाढदिवस आणखी खास बनवत अल्लू अर्जुनने इंस्टाग्रामवर टीझर शेअर केला होता आणि लिहिले होते, "वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी तुम्हा प्रत्येकाचे आभार मानतो! माझे मन कृतज्ञतेने भरले आहे. कृपया धन्यवाद म्हणून माझ्या स्टाईलने हा टीझर स्वीकारा. !"