मुंबई - Karan Johar and Rani Mukerji : चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री राणी मुखर्जी ऑस्ट्रेलियात आहेत. हे दोघेही ऑस्ट्रेलियन संसदेला सिनेमाविषयी संबोधित करण्यासाठी तेथे गेले आहेत. 15 ऑगस्टपासून 15वा वार्षिक भारतीय चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. मेलबर्नमध्ये भारतीय चित्रपट महोत्सव (IFFM), हा भारताबाहेरील आणि देशातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा महोत्सव साजरा केला जात आहे. त्यावेळी हा महोत्सव सुरू होण्यापूर्वीच करण आणि राणीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोत करण आणि राणी मुखर्जी ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांबरोबर दिसत आहेत.
मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय स्टार्स : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एक फोटो त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अँथनी अल्बानीजनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "राणी मुखर्जी आणि करण जोहर मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या प्रचारासाठी कॅनबेरामध्ये आहेत. मेलबर्नचा भारतीय चित्रपट महोत्सव हा भारताबाहेरील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. हा महोत्सव गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचे भारताशी असलेले संबंध, हे भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायाच्या अस्तित्वाचा पुरावा आहेत." आता या पोस्टवर अनेक कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.